IND vs AFG : टीम इंडियाला ऑस्ट्रेलियापेक्षा अफगाणिस्तानकडून जास्त धोका, कुठली 3 चॅलेंजेस असणार?
IND vs AFG : टीम इंडिया सुपर-8 मध्ये ग्रुप-1 मध्ये आहे. टीम इंडियासमोर या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशच आव्हान आहे. या ग्रुपमधील प्रत्येक टीम बरोबर टीम इंडियाचा सामना होईल. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियापेक्षा अफगाणिस्तानकडून जास्त आव्हान मिळू शकतं.

T20 वर्ल्ड कप 2024 चा पहिला टप्पा संपला असून आता नजर सुपर-8 वर आहे. या राऊंडमधील सर्व 8 टीम निश्चित झाल्या आहेत. ग्रुप-A मध्ये पहिल्या नंबरवर राहिलेली टीम इंडिया सुपर-8 मध्ये ग्रुप-1 मध्ये आहे. टीम इंडियासमोर या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांग्लादेशच आव्हान असणार आहे. या ग्रुपमधील प्रत्येक टीम बरोबर टीम इंडियाचा सामना होईल. ग्रुप पाहून तुम्हाला असं वाटेल की, टीम इंडिया समोर मुख्य आव्हान फक्त ऑस्ट्रेलियाच आहे. त्यामुळे आरामात टीम सेमीफायनलमध्ये पोहोचेल. पण हा विचार चुकीचा आहे. कारण टीम इंडियाला ऑस्ट्रेलियापेक्षा अफगाणिस्तानकडून जास्त आव्हान मिळू शकतं.
सुपर-8 राऊंडमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध आहे. हा सामना 20 जूनला बारबडोस ब्रिजटाऊनमध्ये होणार आहे. भारताचा कॅनडाविरुद्ध सामना पावसामुळे रद्द झाला. त्याआधी टीम इंडियाने शेवटचा सामना अमेरिकेविरुद्ध खेळला होता. एका मोठ्या गॅपनंतर टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. प्रदर्शनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. टीम इंडियासमोर 3 मोठी आव्हान असतील.
पहिल आव्हान काय?
वेस्ट इंडिजमध्ये सुपर-8 चे सामने होणार आहे. तिथे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरतील, असा अंदाज आहे. टीम इंडियाकडे चांगले फिरकी गोलंदाज आहेत. पण अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजीत वैविध्य आहे. त्यांच्याकडे ऑफ स्पिनपासून लेग स्पिनर आणि लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनर आहे. कॅप्टन राशिद खानने 3 सामन्यात 6 विकेट घेतलेत. नूर अहमद, मोहम्मद नबी आणि मुजीबउर रहमानने चांगली साथ दिलीय. हे गोलंदाज टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतात.
टीम इंडियासाठी काय सोप नसेल?
ग्रुप स्टेजमध्ये अफगाणिस्तानने आपले सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले आहेत. ब्रिजटाऊनमध्ये ते सुद्धा खेळलेले नाहीत. पण ज्या शहरात अफगाणिस्तानचे सामने झालेत, तिथल्या आणि ब्रिजटाऊनच्या हवामानात, परिस्थितीत काही फरक नाहीय. टीम इंडियाने आपले सर्व सामने न्यू यॉर्कमध्ये खेळले आहेत. तिथे तापमान 6-7 डिग्रीने कमी होतं. न्यू यॉर्कची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल होती. अशावेळी अचानक स्पिन फ्रेंडली विकेटशी जुळवून घेणं सोप नसेल.
तिसर आव्हान काय?
अफगाणिस्तानची स्पिन गोलंदाजी मजबूत आहेच. पण त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी सुद्धा कमालीच प्रदर्शन केलय. खासकरुन डावखुरा वेगवान गोलंदाज फारुकी. त्याने नव्या चेंडूवर 4 विकेट काढून न्यूझीलंडची वाट लावलेली. त्याशिवाय युगांडा आणि पीएनजी टीमवरही तो भारी पडला. त्याने 3 सामन्यात 12 विकेट घेतलेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही नेहमी लेफ्ट आर्म पेस बॉलरचा सहजतेने सामना करत नाहीत. नवीन उल हक और अज्मतुल्लाह ओमरजई सारख्या पेसर्सनी चांगली साथ दिलीय. एकूण मिळून अफगाणिस्तानकडे ऑलराऊंडर बॉलिंग अटॅक आहे.
