T20 World Cup 2021: अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर मोठा विजय, तब्बल 130 धावांनी सामना घातला खिशात, भारताच्या अडचणी वाढल्या

विश्वचषकात भारतीय संघ असणाऱ्या गटातील अफगाणिस्तान संघाने स्कॉटलंड संघावर दांडगा विजय मिळवला आहे. उत्तम फलंदाजीनंतर त्याहून अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने हा विजय मिळवला आहे.

T20 World Cup 2021: अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर मोठा विजय, तब्बल 130 धावांनी सामना घातला खिशात, भारताच्या अडचणी वाढल्या
सामन्यात अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमानने अप्रतिम गोलंदाजी केली.

T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) सुपर 12 फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्या दिवशीपासून उत्कृष्ट खेळ पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ 55 धावांत सर्वबाद, मग भारताचा 10 विकेट्सने पराभव झाल्यानंतर सोमवारी (25 ऑक्टोबर) अफगाणिस्तान संघाने  स्कॉटलंडवर 130 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह सुपर 12 च्या ग्रुप 2 मध्ये अफगाणिस्तान अव्वल स्थानी पोहचला आहे.

टी20 क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तान संघाचा सर्वात मोठा विजय असणाऱ्या या विजयात गोलंदाज मुजीब उर रेहमान आणि राशिद खान यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. आधी फलंदाजीवेळी 190 धावा केल्यानंतर गोलंदाजीवेळी अफगाणिस्तानने स्कॉटलंडला अवघ्या 60 धावांत सर्वबाद केलं.

मुजीबसह राशिदच्या फिरकीची जादू

सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली. यावेळी नजिबउल्लाहने अर्धशतक झळकावत 59 धावा केल्या. तसंच हजरतुल्लाह आणि गरबाज यांनी प्रत्येकी 44 आणि 46 धावा केल्या. तर मोहम्मद शहजादने 22 आणि कर्णधार मोहम्मद नबीने नाबाद 11 धावा करत स्कोरबोर्डवर 190 धावा लगावल्या. पण त्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजानी मात्र अप्रतिम गोलंदाजी केली.

सर्वोत्कृष्ट म्हणजे मुजीबने 4 ओव्हरमध्ये केवळ 20 धावा देत स्कॉटलंडचा निम्मा संघ तंबूत धाडत 5 विकेट मिळवल्या. तर राशिदने 2.2 ओव्हरमध्ये 9 धावा देत 4 विकेट मिळवल्या. तर नवीन उल् हकने एक विकेट घेतली. अशा उत्कृष्ट गोलंदाजीमुळे स्कॉटलंडचा संघ 60 धावांवर सर्वबाद झाला आणि अफगाणिस्तानने 130 धावांनी विजय मिळवला. सामन्यात मुजीबला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

भारताच्या अडचणी वाढल्या

अफगाणिस्तानने या विजयासह भारत असलेल्या ग्रुप 2 मध्ये पहिलं स्थान मिळवलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोघांनी एक एक विजय मिळवला असला तरी अफगाणिस्तानचा नेट रन रेट या मोठ्या विजयामुळे तब्बल +6.500 इतका झाला आहे. त्यात भारत एक सामना पराभूत झाला आहे. ज्यामुळे भविष्यात पुढील फेरीत जाण्याची संधी येईल तेव्हा अफगाणिस्तानच्या नेट रनरेटला तोड देण्यासाठी भारताला मोठ्या विजयांची गरज आहे.

इतर बातम्या

‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

(In T20 World Cup 2021 Afghanistan beat scotland by 130 runs and tops the table)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI