AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: नशीब बलवत्तर! एका चेंडूवर तीनदा रनआऊट होता होता वाचला, निम्मा संघ मिळूनही करु शकला नाही बाद

आयर्लंड विरुद्ध नामीबिया सामन्यात नामीबिया संघाने 8 विकट्सने विजय मिळवत सुपर 12 मध्ये स्थान मिळवलं आहे. पण सामन्यात त्यांच्याकडून एका चेंडूवर झालेली मिसफिल्ड अतिशय लाजिरवाणी आणि हास्यास्पद ठरली.

T20 World Cup 2021: नशीब बलवत्तर! एका चेंडूवर तीनदा रनआऊट होता होता वाचला, निम्मा संघ मिळूनही करु शकला नाही बाद
आयर्लंड विरुद्ध नामीबिया सामन्यातील एक क्षण
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 9:13 PM
Share

T20 Cricket World Cup 2021: टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) सामन्यांच्या सुरुवाती पासूनच  दररोज काहीतरी हटके पाहायला मिळत आहे. मग ते आयर्लंडचा गोलंदाज कर्टिस कँफर (Curtis Campher) याने नेदरलँडच्या 4 फलंदाजाना सलग 4 चेंडूवर तंबूत धाडलेला किस्सा असूदे किंवा श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने नामिबीयाच्या फलंदाचा एकहाती पकडलेला झेल सारेच किस्से प्रेक्षणीय आहेत. पण आज (22 ऑक्टोबर) आयर्लंड विरुद्ध नामिबीया यांच्यात झालेल्या सामन्यात घडलेला एक किस्सा अगदी हास्यास्पद आहे.

आयर्लंडच्या डावाच्या अखेरच्या चेंडूवर तीनदा आयर्लंडचा फलंदाज रनआऊट होता होता वाचला. नामिबीयाचा निम्मा संघ मिळूनही त्याला धावतीच करु शकला नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून आयसीसीने (ICC) देखील त्यांच्या इन्स्टग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. आय़र्लंडचा संघ नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी करत असताना त्यांच्या शेवटच्या चेंडूवर धावून अधिकाधिक रन घेऊन इच्छित होता. यावेळी चेंडू पहिलीच धाव घेताना नामिबीया संघाच्या खेळाडूच्या हातात आला. पण त्याच्याकडून चूकीचा थ्रो झाल्याने आयर्लंडने अतिरिक्त धाव घेतली. त्यानंतर पुढेही दोन्हीवेळा असंच झाल्याने एकाच चेंडूवर तीनदा आयर्लंडच्या फलंदाजाला जीवदान मिळालं.

नामिबीया थाटात सुपर 12 मध्ये दाखल

या मिसफिल्डमुळे आयर्लंड संघाने 125 धावांपर्यंत मजल मारली. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या नामिबीया संघाने केवळ 2 विकेट्स गमावत 18.3 षटकांत हे आव्हान पूर्ण करत 126 धावा केल्या. या विजयासोबतच त्यांनी सुपर 12 मध्येही स्थान मिळवलं. फलंदाजीवेळी जेरहार्ड एरासमसने दमदार अर्धशतक लगावत नाबाद 53 धावा ठोकल्या. ज्यामुळे संघाचा विजय सोपा झाला.

हे ही वाचा

अक्षर पटेल मुख्य संघातून राखीव खेळाडूंमध्ये जाण्यामागे हार्दीक पंड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?

T20 World Cup साठी भारतीय संघाची रणनीती ठरली, अशी असेल टीम इंडिया, काय म्हणाले रवी शास्त्री?

…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

(In T20v world cup match between Ireland vs Namibia Funny miss runout chance on last ball)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.