AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup च्या सराव सामन्यात भारताचा विजय, पण संघ व्यवस्थापनाच्या डोकेदुखीत वाढ, कसे निवडणार अंतिम 11?

विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी भारत सराव सामने खेळत आहे. नुकताच भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला सराव सामना पार पडला. ज्यामध्ये भारताने इंग्लंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवला.

T20 World Cup च्या सराव सामन्यात भारताचा विजय, पण संघ व्यवस्थापनाच्या डोकेदुखीत वाढ, कसे निवडणार अंतिम 11?
इशान किशन
Updated on: Oct 19, 2021 | 6:06 PM
Share

मुंबई: टी20 विश्वचषकाला (T20 World Cup 2021) सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. भारत हा सुपर 12 मध्ये असल्याने सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यात भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. पण तत्पूर्वी सराव म्हणून भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत भिडणार आहे. यातीलच एक सामना सोमवारी (18 ऑक्टोबर) दुबईच्या मैदानात पार पडला. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड (India vs England) आमने-सामने होते. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय तर मिळवला. पण एका खेळाडूच्या तुफान खेळीमुळे संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे.

या सामन्यात युवा फलंदाज इशान किशनने (Ishan Kishan) 70 धावांची धमाकेदार खेळी केली. त्यामुळे आता विश्वचषकाच्या सामन्यात त्याला संधी देण्यासाठी त्याचा फॉर्म अगदी योग्य असल्याचे दिसून येत आहे. पण संभाव्य अंतिम संघात इशान किशन हा सलामीवीर बसत नसल्याने संघ व्यवस्थापन चिंतेत आहे. भारताचा माजी  फलंदाज वीवीएस. लक्ष्मण(VVS Laxman) यानेही याबाबत माहिती दिली. लक्ष्मण त्याचं मत जाहीर करताना म्हणाला, ”इशान त्याच्या धडाकेबाज खेळीने स्वत:हून संघाला त्याला समाविष्ट करुन घेण्यासाठी भाग पाडत आहे.”

कसं आहे संघाचं गणित?

सध्या भारतीय संघाचा विचार करता त्यामध्ये गोलंदाजीमध्ये सतत बदल सुरु असतात. फिरकीपटू अधिक की वेगवान गोलंदाज अधिक? हे बदल होतच असतात. पण फलंदाजीमध्ये सहसा बदल होत नाहीत. पण टी20 विश्वचषकात संघात काही मोठे बदल झाले. ज्यात अनुभवी सलामीवीर शिखर धवनला विश्रांती देण्यात आल्याने सलामीला रोहित शर्माच्या सोबत केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. तसंच अधिकचा पर्याय म्हणून इशानलाही अंतिम 15 मध्ये घेण्यात आलं आहे. पण आका इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात रोहित नसताना इशानने केेलेली जबरदस्त खेळी संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवत आहे. कारण इशानला संघात घेण्यासाठी सलामीवीर राहुलला विश्रांती द्यावी लागेल. पण राहुलनेही या सामन्यात 51 धावा ठोकल्या. त्यामुळे नेमकी संघ बांधणी कशी करणार? हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे.

पहिला सराव सामना खिशात

पहिल्याच सराव सामन्यात भारताने इंग्लंडला 7 विकेट्सने मात दिली. या सामन्यात भारताने सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यानंतर इंग्लंडने मात्र दमदार फलंदाजी करत 188 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यामध्ये बेयरस्टोच्या 49, लियामच्या 30 धावांसह मोईन अलीने अखेरच्या काही षटकात 20 चेंडूत केलेल्या नाबाद 43 धावांनी धावसंख्या वाढवण्यात मोठं योगदान दिलं. ज्यामुळे संघाचा स्कोर भलामोठा झाला. भारताकडून गोलंदाजीत शमीने उत्तम गोलंदाजी करत महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्या. तर राहुल चाहरने आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली. ज्यामुळे भारताला विजयासाठी 189 धावांचे आव्हान होते.

या तगड्या आव्हाना पाठलाग करण्यासाठी आलेले भारतीय फलंदाज सुरुवातीपासून चांगल्या लयीत होते. रोहित शर्मा नसल्याने केएल राहुल सोबत इशान किशन सलामीला आला. यावेळी 82 धावापर्यंत एकही विकेट गेला नव्हता. तोवर राहुलने 51 धावा करत अर्धशतकही लगावलं. राहुल अर्धशतक होताच बाद झाला. ज्यानंतर कोहलीही 11 धावा करुन बाद झाला. पण इशानने मात्र धमाकेदार फलंदाजी सुरु ठेवली पण अखेर 70 धावा झाल्या असताना त्याने विश्रांती घेण्यासाठी स्वत:हून माघार घेतली. त्यानंतर सूर्यकुमार 8 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर ऋषभ पंतने (नाबाद 29) आणि हार्दीकने (नाबाद 12) एक ओव्हर राखून भारताला विजय मिळवून दिला.

विश्वचषकाच्या सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दीक पंड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

हे ही वाचा

अक्षर पटेल मुख्य संघातून राखीव खेळाडूंमध्ये जाण्यामागे हार्दीक पंड्या, वाचा नेमकं प्रकरण काय?

T20 World Cup साठी भारतीय संघाची रणनीती ठरली, अशी असेल टीम इंडिया, काय म्हणाले रवी शास्त्री?

…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

(In Warm Up match against England Ishant plays Good inning now Team management is thinking him to add him in Final 11)

शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड.
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले...
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले....