IND vs SA A : टीम इंडिया पहिल्या वनडेसाठी सज्ज, तिलक वर्माकडे नेतृत्व, सामना किती वाजता?
India A vs South Africa 1st Unofficial One Day Live Streaming : इंडिया ए टीमची युवा ब्रिगेड दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध अनऑफीशियल वनडे सीरिजसाठी सज्ज आहे. जाणून घ्या पहिला सामना कुठे होणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना कोलकातीमधील ईडन गार्डन्समध्ये होणार आहे. त्याआधी 13 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यात अनऑफीशियल वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारताच्या मुख्य संघातील बहुतांश खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. तिलक वर्मा या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर मार्कस एकरमॅन दक्षिण आफ्रिका ए संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. उभयसंघातील पहिला सामना कुठे आणि कधी पाहायला मिळणार? हे आपण जाणून घेऊयात.
भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए पहिला एकदिवसीय सामना कधी?
भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए पहिला एकदिवसीय सामना गुरुवारी 13 नोव्हेंबरला होणार आहे.
भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए पहिला एकदिवसीय सामना कुठे?
भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए पहिला एकदिवसीय सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियममध्ये होणार आहे.
भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए पहिल्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए पहिल्या एकदिवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 1 वाजता टॉस होईल.
भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.
भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
भारत ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर जिओहॉस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.
ऋतुराज गायकवाड उपकर्णधार
दक्षिण आफ्रिका ए विरूद्धच्या मालिकेसाठी पुणेकर ऋतुराज गायकवाड याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ऋतुराजला सातत्याने चांगल्या कामगिरीनंतरही भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाहीय. त्यामुळे ऋतुराजकडे या मालिकेत बॅटिंगने कडक कामगिरी करुन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि टी 20i सीरिजसाठी दावा ठोकण्याची संधी आहे.
तसेच या मालिकेसाठी अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यासारखे मुख्य संघातील खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर इतर युवा खेळाडूंना चमकदार कामगिरी करुन कमबॅकचा दावा ठोकण्याची संधी आहे.
