IND vs PAK : अफगाणिस्तानच्या शिरपेचात मानाचा तुरा, भारताविरूद्ध रचला इतिहास
IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये मोठा इतिहास रचला गेला आहे. या सामन्यामध्ये रोहित आणि इशान यांनी धमाकेदार खेळी केली त्याआधी अफगाणिस्तानचा कर्णधार आणि एका खेळाडूने मोठ्या रेकॉर्डची नोंद केलीये.

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि अफगाणिस्तानविरूद्धचा सामना सुरू आहे. अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 272 / 8 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघाकडून कर्णधार हशमतुल्लाह शाहीदीने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. त्यासोबतच अजमातुल्ला उमरझाई यानेही 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दोघांच्या खेळीमुळेच अफगाणिस्तान संघाचा डाव सावरला कारण इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. दोघांच्या भागीदारीने अफगाणिस्तानसाठी मोठा विक्रम रचला आहे.
अफगाणिस्तान संघाच्या 63 धावांवर 3 विकेट्स गेल्या होत्या, त्यावेळी कर्णधार हशमतुल्लाह शाहीदी आणि अजमातुल्ला उमरझाई भारतीय गोलंदाजांना विकेट मिळू दिली नाही. दोघांनीही चिवट फलंदाजी करत डाव सावरला आणि संघाची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरूवात केली. हशमतुल्लाह आणि उमरझाई दोघांनी 121 धावांची भागीदारी केला. अफगाणिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील वर्ल्ड कपमधील कोणत्याही विकेटसाठी केलेली दुसरू सर्वोच्च भागीदारी ठरली.
133 – इकराम अलीखिल, रहमत शाह विरुद्ध WI, लीड्स, 2019 121 – अजमतुल्ला ओमरझाई, हशमतुल्ला शाहिदी, विरुद्ध IND, दिल्ली, 2023 94 – असगर अफगाण, हशमतुल्ला शाहिदी विरुद्ध ENG, मँचेस्टर, 2019 88 – असगर अफगाण, समिउल्ला शिनवारी विरुद्ध एसएल, ड्युनेडिन 86 – नजीबुल्ला झद्रान, समिउल्ला शिनवारी विरुद्ध न्यूझीलंड, नेपियर
दरम्यान, या सामन्यामध्ये भारताची दमदार सुरूवात झाली असून रोहित शर्मा याने शतक केलं आहे. ओपनिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना धुतलं आहे. रोहित शर्मा याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सर मारले आहेत.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (C), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्लाह शाहीदी (C), रहमानउल्ला गुरबाज (W), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, अजमातुल्ला उमरझाई, राशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.
