R Aswhin | आर अश्विनचा ‘पंच’, हरभजन सिंह याचा रेकॉर्ड ब्रेक, तर ‘या’ विक्रमाची बरोबरी

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या कसोटी सामन्यात 132 धावा आणि एका डावाने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात अश्विनने 5 विकेट्स घेत मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

R Aswhin | आर अश्विनचा 'पंच', हरभजन सिंह याचा रेकॉर्ड ब्रेक, तर 'या' विक्रमाची बरोबरी
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 10:59 PM

नागपूर : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा नागपूर कसोटीत तिसऱ्याच दिवशी पराभव केला. टीम इंडियाने कसोटी रँकिंगमधील नंबर 1 टीम असलेल्या ऑस्ट्रेलियावर 1 डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने या विजयासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली.रवींद्र जडेजा याने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 2 अशा एकूण 7 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विन याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

अश्विनने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अश्विनची कसोटीत 5 विकेट्स घेण्याची ही 31 वी वेळ ठरली. सर्वाधिक 5 विकेट्सच्या बाबतीत श्रीलंकेचा माजी दिग्गज मुथैय्या मुरलीथरन आहे. मुरलीने एकूण 67 वेळा हा कारनामा केलाय. तर शेन वॉर्नने 37, रिचर्ड हेडली 36, अनिल कुंबळे 35, रंगना हेराथ 34 आणि जेम्स एंडरसनने याने 32 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी

अश्विनने अनिल कुंबळे याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अश्विनने भारतात 25 वेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा भीमपराक्रम केला आहे. अश्विनने यासह अनिल कुंबळे याच्या 5×25 विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी केली.

हे सुद्धा वाचा

हरभजनचा रेकॉर्ड ब्रेक

अश्विन ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. अश्विनच्या नावावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 कसोटी सामन्यांमध्ये 97 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने याबाबतीत हरभजनचा रेकॉर्ड ब्रेक केलाय.हरभजनने 18 टेस्ट सामन्यांमध्ये 95 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनच्या पुढे आता अनिल कुंबळेच आहे. कुंबळेच्या नावावर 20 टेस्टमध्ये 111 विकेट्स आहेत.

टीम इंडिया प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, एस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि स्कॉट बोलँड.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.