AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात वाद? स्टंप माइकमध्ये सर्वकाही रेकॉर्ड, Video Viral

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात रोहित शर्माने चांगली फलंदाजी केली. पण फलंदाजी करताना श्रेयस अय्यर आणि रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात अय्यर आणि रोहित शर्मा यांच्या वाद झाल्याचं बोललं जात आहे.

IND vs AUS : रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात वाद? स्टंप माइकमध्ये सर्वकाही रेकॉर्ड, Video Viral
IND vs AUS : रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात वाद? स्टंप माइकमध्ये सर्वकाही रेकॉर्ड, Video ViralImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Oct 23, 2025 | 4:42 PM
Share

भारत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार शुबमन गिल आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाल्याने टीम इंडियावरील दबाव वाढला होता. शुबमन गिल 9 धावांवर बाद झाला आणि विराट कोहलीला सलग दुसऱ्यांदा खातंही खोलता आलं नाही. त्यामुळे भारतीय संघाचा डाव रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरने सावरला. तिसऱ्या विकेटसाठी या दोघांनी मळून 136 चेंडूत 118 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच भारताला 264 धावांपर्यंत मजल मारता आली. रोहित शर्माने या सामन्यात 97 चेंडूत 73 धावांची खेळी केली, तर श्रेयस अय्यरने 61 धावा केल्या. पण रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धावांसाठी दोघांमध्ये तू तू मै मै झाल्याचं बोललं जात आहे. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात

जोश हेझलवूडच्या गोलंदावरी रोहित शर्माने बचावात्मक शॉट खेळला. तेव्हा नॉन स्ट्राईकला उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने धाव घेण्यास मनाई केली. त्यानंतर रोहित शर्मा संतापला आणि एक धाव घ्यायला हवी होती हे समजवून सांगितलं. स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झालेली चर्चा ऐकता असं वाटतं की चर्चा कमी आणि वादच जास्त झाला आहे. अय्यर जेव्हा मैदानात उतरला तेव्हा भारताने 17 धावांवर दोन गडी गमावले होते. पण त्यानंतर दोघांनी संघाचा डाव सावरला.

रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात काय चर्चा?

  • रोहित शर्मा- अरे श्रेयस, ही धाव असायला हवी होती.
  • श्रेयस अय्यर – तू प्रयत्न कर, मला दोष देऊ नकोस.
  • रोहित शर्मा- अरे, तुला निर्णय घ्यावा लागेल. तो सातवा षटक टाकत आहे.
  • श्रेयस अय्यर – मला माहित नाही तो कोणत्या अँगलने धावत आहे. तू निर्णय घे.
  • रोहित शर्मा- मी तो निर्णय घेऊ शकत नाही.
  • श्रेयस अय्यर – तो तुमच्या समोर आहे.

भारताने ऑस्ट्रेलिया विजयासाठी 265 दावांचं आव्हान दिलं आहे. मात्र हा सामना भारताच्या हातातून निसटत चालला आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांना फोडून काढलं आहे. त्यामुळे आता हा सामना जिंकणं कठीण दिसत आहे. भारताने हा सामना गमावला तर मालिकाही हातातून जाईल. तीन सामन्यांची वनडे मालिका ऑस्ट्रेलिया 2-0 ने जिंकेल.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....