ind vs aus : हार मानतील ते कांगारू कसले, तिसऱ्या वनडेत भारताचा पराभव

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. कांगारूंनी 21 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली आहे.

ind vs aus : हार मानतील ते कांगारू कसले, तिसऱ्या वनडेत भारताचा पराभव
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 10:41 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला 269 धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 248 धावांवरच आटोपला. भारताकडून विराट कोहलीने 54 धावांची अर्धशतकी खेळी मात्र दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. कांगारूंनी 21 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली आहे.

भारताची सुरूवात चांगली झाली होती, सलामीवर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी  65 धावांची सलामी दिली होती. रोहित शर्मा 11 धावा करून परतला त्यानंतर लगोलग शुबमनला 37  धावांवर झॅम्पाने पायचीत करत त्यालाही टिकू दिलं नाही. विराट कोहली आणि के. एल. राहुल यांची जोडी जमली होती मात्र मोठा खेळण्याच्या प्रयत्नात तोही 32 धावा करून बाद झाला.

विराट मैदानावर टिकून होता, अक्षर पटेल वरच्या क्रमांकावर खेळायला आला होता. मात्र तो धावबाद झाला त्यानंतर हार्दिक पांड्या आणि विराटने आपल्या हातात सुत्र घेतलीत. अर्धशतक करून झाल्यावर विराट बाद झाला. सूर्या आला आणि आजही तो पहिल्याच बॉलवर गेला.  हार्दिक आणि जडेजा मैदानात होते मात्र झॅम्पाने दोघांना बाद करत सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकवला. झॅम्पाने 4 तर अॅश्टन आगर 2, स्टॉइनिस आणि अॅबॉटने 1 विकेट घेतली.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या कांगारूंनी सावध सुरूवात केली. सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी 68 धावांची भागीदारी केली.  भारताला पहिली विकेट 11 व्या षटकामध्ये मिळाली. हार्दिकने टीम इंडियाला झटपट 1 नाही 2 नाही तर 3 विकेट्स मिळवून दिल्या. इतकच नाही, तर हार्दिकने स्टीव्हन स्मिथ याचा शून्यावर काटा काढून दुसऱ्या वनडेतील बदलाही घेतला.

हार्दिकनंतर कुलदीप यादवने कांगारूंच्या मधल्या फळाला एकट्याने सुरूंग लावला. डेव्हिड वॉर्नर23 धावा, मार्नस लॅबुशेन 28  आणि अॅलेक्स कॅरी 38 धावा यांना बाद कुलदीपने बाद केलं. यामधील कॅरीला त्याने बोल्ड केलं तो चेंडू मॅजिक बॉलसारखाच स्पिन झालेला पाहायला मिळाला. ऑफ साईडला पडलेल्या चेंडूने लेग स्टम्प उडवला. अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनीही 2 गडी बाद केले होते.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.