AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya | हार्दिक पंड्या याने स्टीव्हन स्मिथ याचा काटा कढलाच, टीम इंडियाचं सॉल्लिड कमबॅक

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅके केलं आहे. सुरुवातीला वरचढ वाटत असलेल्या कांगारुंना हार्दिक पंड्या याने झटपट 3 धक्के देत बॅकफुटवर ढकललं आहे. यासह टीम इंडियाने मुंसडी मारली.

Hardik Pandya | हार्दिक पंड्या याने स्टीव्हन स्मिथ याचा काटा कढलाच, टीम इंडियाचं सॉल्लिड कमबॅक
| Updated on: Mar 22, 2023 | 3:49 PM
Share

चेन्नई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना हा चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. ही 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने दोन्ही संघांसाठी मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिाने टॉस जिकंला. त्यानंतर कॅप्टन स्टीव्हन स्मिथने बॅटिंगचा निर्णय घेतला. ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीने आश्वासक अर्धशतकी खेळी केली. भारतीय गोलंदाजांचा या सलामी जोीडीने चांगलाच समाचार घेतला. दोघेही फटकेबाजी करत असल्याने टीम इंडिया अडचणीत होती. मात्र टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंडया याने टीम इंडियाला झटपट 1 नाही 2 नाही तर 3 विकेट्स मिळवून दिल्या. इतकच नाही, तर हार्दिकने स्टीव्हन स्मिथ याचा शून्यावर काटा काढून दुसऱ्या वनडेतील बदलाही घेतला.

स्टीव्हन स्मिथ याचा बदला घेतलाच

हेड आऊट झाल्यानंतर कॅप्टन स्टीव्हन स्मिथ मैदानात आला. हार्दिक सामन्यातील 13 वी ओव्हर टाकायला आला. ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर स्मिथचा काटा काढला. स्टीव्हन ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र बॉलचा बॅटला कट लागला. विकेटकीपर केएल राहुल याने कॅच घेतला. अशा प्रकारे स्टीव्ह शून्यावर बाद झाला. यासह हार्दिकने स्टीव्हचा बदला घेतला. स्टीव्हन स्मिथ याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पंड्या याचा हवेत झेपावत कॅच घेतला होता. यामुळे पंड्याला शून्यावर परतावं लागलं होतं. मात्र पंड्याने या तिसऱ्या सामन्यात स्टीव्हला झिरोवर आऊट करत परतफेड केली.

स्टीव्ह आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 2 बाद 74 अशी स्थिती झाली. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर मैदानात आला. पंड्याने सामन्यातील 13 वी ओव्हर टाकल्यानंतर पुन्हा 15 वी ओव्हर टाकायला. या ओव्हरमध्ये पुन्हा पंड्याने चमत्कार केला. पंड्याने सेट बॅट्समन मिचेल मार्श याच्या दांड्या गुल केल्या. हार्दिकने मिचेलला 47 धावांवर क्लिन बोल्ड केलं. अशाप्रकारे पंड्याने 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 3 विकेट्स घेतल ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर फेकलं.

हार्दिक-स्टीव्ह रायव्हलरी

हार्दिक आणि स्टीव्ह यांच्यातील रायव्हलरीत हार्दिक पंड्याने या बाजी मारली आहे. हार्दिकने आतापर्यंत 8 सामन्यात स्टीव्हला याआधी 5 वेळा आऊट केलं होतं. तर ही सहावी वेळ ठरली आहे. हार्दिकने स्टीव्हला 8 सामन्यात 72 धावा देत 6 वेळा आऊट केलं आहे. तसेच या मालिकेत हार्दिकने स्टीव्हला आऊट करण्याची ही दुसरी वेळ ठरली. हार्दिक याच्याआधी इंग्लंडच्या आदिल राशिद याने स्टीव्हन स्मिथ याला 6 वेळा आऊट करण्याचा कारनामा केला आहे.

हार्दिक पंड्याकडून कांगारुंना झटपट 2 झटके

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन) , शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ (क), मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स केरी (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन आगर, शॉन अॅबॉट, मिचेल स्टार्क आणि अॅडम झॅम्पा.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....