एकाच दिवशी टीम इंडिया खेळणार दोन सामने, एक ऑस्ट्रेलिया आणि दुसरा इंग्लंडविरुद्ध
भारतीय क्रीडारसिकांसाठी रविवारचा दिवस खास असणार आहे. कारण एकाच दिवशी दोन सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. भारतीय पुरूष आणि महिला संघाचा सामना आहे. यात भारतीय महिला संघासाठी करो या मरोची लढाई आहे.

भारतीय क्रीडारसिकांसाठी रविवार क्रिकेटचा डबल धमाका ठरणार आहे. कारण एकाच दिवशी दोन सामने पाहता येणार आहेत. भारतीय पुरूष वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तर वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाछठी भारताला हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. त्यामुळे भारतासाठी करो या मरोची लढाई आहे. दुसरीकडे , भारतीय पुरुष वनडे संघाचं नेतृत्व पहिल्यांदाच शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. वनडे वर्ल्डकप 2027 दृष्टीने ही पायाभरणी केली जात आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाचाही कस लागणार आहे. अशा स्थितीत दोन्ही सामने भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड वुमन्स वर्ल्डकप सामना
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत भारतीय महिला संघाने विजयाने सुरुवात केली होती. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर विजयाची गाडी रूळावरून घसरली. पहिल्यांदा दक्षिण अफ्रिकेने आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धचा सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात पराभव झाला तर उपांत्य फेरीचं गणित जर तर वर येऊन ठेपणार आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात काहीही करून जिंकणं भाग आहे.
ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. तर इंग्लंडने एक विजय मिळवताच उपांत्य फेरीत पोहोचेल. त्यामुळे इंग्लंडने भारताविरूद्धचा सामना जिंकताच दुसरा संघ उपांत्य फेरीतील जागा निश्चित करेल. दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ देखील शर्यतीत आहेत. त्यामुळे आता प्रत्येक सामन्यानंतर गणित बदलताना दिसणार आहे. भारत इंग्लंड हा सामना त्यामुळे महत्त्वाचा ठरणार आहे.
भारत ऑस्ट्रेलिया सामना
क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाने मोक्याच्या क्षणी भारताला पराभवाची धूळ चारली आहे. 2003 आणि 2023 वनडे वर्ल्डकप हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. दोन्ही स्पर्धेत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा वचपा काढण्याची चांगली संधी भारताकडे आहे. पण ती जखम काही भरून निघणार आहे. पण आतापासून भारताला चाचपणी करणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताची ऑस्ट्रेलियात कशी कामगिरी होते याकडे लक्ष असणार आहे.
