AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्ग राजावर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून! अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी विसरा

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताची पुरती वाट लागली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर भारताकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पदरी निराशा पडली. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगण्याची शक्यता आहे.

निसर्ग राजावर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून! अन्यथा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी विसरा
| Updated on: Dec 16, 2024 | 1:07 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पूर्णपणे कांगारुंच्या पारड्यात झुकलेला आहे. त्यामुळे आता भारताचं भवितव्य पूर्णत: पावसावर म्हणजेच निसर्ग राजावर अवलंबून आहे. कारण हा सामना ड्रॉ झाला तर काही अंशी भारताच्या अंतिम फेरीच्या आशा पल्लवित राहतील. भारताकडून आघाडीचे फलंदाज सपशेल फेल ठरले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कला डिवचणाऱ्या यशस्वी जयस्वालला स्पीड काय असतो ते दाखवून दिलं आहे. डे नाईट कसोटीत पिसं काढल्यानंतर गाबा कसोटीतही स्टार्कचा बळी ठरला आहे. त्याला फक्त 4 धावा करता आल्या. दुसरीकडे, रोहित शर्माच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. क्रीडाप्रेमींनी रोहित शर्माच्या कर्णधारपदात घेतलेल्या निर्णयावर टीकास्त्र सोडलं आहे. डे नाईट कसोटी नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय असो की गाबा कसोटीतील निर्णय.. दोन्ही वेळेस भारताला त्याचा फटका बसला आहे. जसप्रीत बुमराहाच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे अपेक्षा वाढल्या होत्या. रोहित शर्माच्या नेतृत्वात ही लय कायम राहील असं वाटत होतं. पण पुन्हा एकदा तसंच झालं आहे. डे नाईट कसोटी सामना गमावल्यानंतर आता गाबा कसोटी सामनाही गमवण्याची वेळ आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावांची खेळी केली आहे. दुसरीकडे भारताचे तिसऱ्या दिवशीचा खेळ पाऊस आणि खराब लाईटमुळे थांबवला. त्यामुळे भारताने 4 गडी गमवून 51 धावा केल्या आहेत. अजूनही भारत 394 धावांनी पिछाडीवर आहे. भारताची फलंदाजी पाहता. भारत जास्तीत जास्त 200 धावांपर्यंत मजल मारू शकतो अशी स्थिती आहे. त्यामुळे भारताला कसाही करून चौथा दिवस फलंदाजी करावी लागेल. अन्यथा पाऊस पडला तर हा सामना ड्रॉ होऊ शकतो, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा केएल राहुल नाबाद 33 आणि रोहित शर्मा नाबाद 0 धावांवर खेळत आहेत. भारताचे आघाडीचे फलंदाज काही खास करू शकले नाही. यशस्वी जयस्वाल 4, शुबमन गिलं 1, विराट कोहली 3 आणि ऋषभ पंत 9 धावा करून बाद झाले आहेत. मिचेल स्टार्कने 2, जोश हेझलवूडने 1 आणि पॅट कमिन्सने 1 गडी बाद केला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल