AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : कॅप्टन रोहितला खोटं ठरवलं! बांगलादेश विरुद्ध हा खेळाडू अपयशी

India vs Bangladesh Test Series : कर्णधार रोहित शर्मा याने विकेटकीपर बॅट्समनला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली. मात्र हा खेळाडू कॅप्टन रोहितच्या विश्वासावर खरा उतरू शकला नाही.

IND vs BAN : कॅप्टन रोहितला खोटं ठरवलं! बांगलादेश विरुद्ध हा खेळाडू अपयशी
r ashwin rohit sharma team indiaImage Credit source: Rohit Sharma X Account
| Updated on: Sep 19, 2024 | 7:39 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने विश्वासाने एका खेळाडूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान दिलं. मात्र त्या फलंदाजाने कॅप्टन रोहितला चुकीचं ठरवलं. रोहितने या खेळाडूला संधी देऊन आपल्या पायावर कुऱ्हाड मारल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे. बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने पहिल्याच तासात कॅप्टन रोहित, शुबमन गिल आणि विराट कोहली या 3 मोठ्या विकेट्स गमावल्या. टीम इंडिया अडचणीत असताना या खेळाडूकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र त्या खेळाडूला टीम इंडियाला अडचणीतून काढता आलं नाही.

कॅप्टन रोहितने बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याचा जावई केएल राहुल याला संधी देऊन चूक केली की काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. केएल सहाव्या स्थानी बॅटिंगसाठी आला.केएलला सहाव्या स्थानी खेळवण्याचा प्रयोग फसला. केएल सहाव्या स्थानी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. केएलने 52 बॉलमध्ये 16 धावा केल्या. मेहदी हसन मिराज याने केएल राहुल याला आऊट केलं. केएलला ठिकठाक सुरुवात मिळाली होती.तसेच टीम इंडिया अडचणीत असल्याने त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र केएल रोहितच्या विश्वासावर खरा उतरण्यात अपयशी ठरला.

दरम्यान केएलला कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. तर दुसऱ्या बाजुला केएलला चांगली सुरुवातीचं मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश येत असल्याचं त्याच्या 5 डावातील आकड्यावरुन स्पष्ट होतंय. केएलने कसोटीतील गेल्या 5 डावात अनुक्रमे 4,8,86,22 आणि 16 अशा धावा केल्या आहेत.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.