IND vs BAN : यशस्वी जयस्वालचा कारनामा, या स्टार क्रिकेटरचा रेकॉर्ड ब्रेक

Yashasvi Jaiswal Test Cricket : यशस्वी जयस्वाल याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी अर्धशतकी खेळी केली. यशस्वीने यासह खास रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

IND vs BAN : यशस्वी जयस्वालचा कारनामा, या स्टार क्रिकेटरचा रेकॉर्ड ब्रेक
yashasvi jaiswal ind vs banImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 6:26 PM

टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज मुंबईकर यशस्वी जयस्वाल याने धमाका केला आहे. यशस्वीने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी अर्धशतकी खेळी केली. यशस्वीने या अर्धशतकासह टीम इंडियाला अडचणीत असताना सावरलं. यशस्वीने 89 बॉलमध्ये 11 फोर ठोकून 56 रन्स केल्या. यशस्वी यासह 2024 या वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. यशस्वीने श्रीलंकेच्या कामिंदु मेंडीसला मागे टाकत दुसरं स्थान पटकावलं आहे. त्यामुळे कामिंदुला एका स्थानाचं नुकसान झाल्याने तो तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. तर इंग्लंडचा जो रुट हा या यादीत अव्वल स्थानी आहे.

रुटने नुकत्याच श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती. रुटने आतापर्यंत 2024 या वर्षात 11 सामन्यांमध्ये 986 धावा केल्या आहेत. तर यशस्वीने 7 सामन्यांमध्ये 764 धावा जोडल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या कामिंदु मेंडीस याने 6 सामन्यांमध्ये 748 रन्स केल्या आहेत. तसेच यशस्वी टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणार फलंदाज आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी शुबमन गिल विराजमान आहे. शुबमनने या वर्षात कसोटीत 498 तर कॅप्टन रोहित शर्माने 461 रन्स केल्या आहेत.

दरम्यान टीम इंडिया-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम येथे खेळवण्यात येत आहे. बांगलादेशने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. बांगलादेशने पहिल्या 1 तासात कॅप्टन रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांना आऊट करत टीम इंडियाला मागे टाकलं. मात्र त्यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. मात्र त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल हे दोघे सलग 2 ओव्हरमध्ये आऊट झाले. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा अडचणीत सापडली. टीम इंडियाची स्थिती 6 बाद 144 झाली. मात्र त्यानंतर रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोघांनी शानदार भागीदारी करत टीम इंडियाला 300 पार पोहचवलं. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 80 ओव्हरमध्ये 339 रन्स केल्या आहेत. जडेजा आणि अश्विन ही जोडी नाबाद परतली आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या जोडीकडून अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारणार.
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'
'भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी...'.
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
'त्यांना गाडून भगवा फडकवणार', शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी
शिंदे पुरून उरला, घासून पुसून नाही ठासून...',मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी.
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा
शिवतीर्थावर देवाची आळंदी, चोरांची आळंदी तर...,राऊतांचा शिंदेंवर निशाणा.
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात
'तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही', आदित्य ठाकरेंचा भरभाषणातून घणाघात.
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
तुम्ही फक्त पोस्टमन बेक्कार क्रेडीट.. सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल.
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'
जरांगेंची तोफ धडाडली, नारायण गडावरून इशारा; 'उलथापालथ करावीच लागेल..'.
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द
'हट्ट धरू नका, एकच वचन द्या',जरांगेंनी मराठ्यांकडून कोणता मागितला शब्द.
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन
तर राज ठाकरेंनी सोबत यावं, शिंदेंच्या नेत्याचं मनसे अध्यक्षांना आवाहन.