IND vs BAN : अश्विन ठोकत राहिला शतक झालं अन् धोनीच्या त्या ऐतिहासिक विक्रमाचीही बरोबरी, जाणून घ्या
बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाचा स्टार ऑल राऊंडर आर.अश्विन याने शतक ठोकले आहे. या शतकाहसह त्याने टीम इंडियाचा माजी कॅप्टन धोनीच्या ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी केली आहे.
टीम इंडिया आणि बांगलादेशमधील (IND vs BAN First Test) पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. सामन्यात पहिल्याच दिवशी पाहुण्या संघाने टीम इंडियाला दोन सत्रात बॅकफूटला ढकललं होतं. मात्र तिसऱ्या सत्रात टीम इंडियाचे दोन हुकमी एक्के असलेल्या आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या नाबाद 195 धावांच्या भागादारीने टीम इंडियाचा डाव सावरला. पहिल्या दिवशी टॉप ऑर्डर फेल ठरल्यावर अश्विन आणि जडेजाना मैदानावर तळ ठोकत बांगलादेशच्या गोलंदाजांचा घाम काढला. शतकवीर आर अश्विनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यामध्ये माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
ऑल राऊंडर अश्विन याने 112 चेंडूत 102 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर अश्विनने आपले करियरमधील सहावे शतक पूर्ण केले. या शतकासह त्याने टीम इंडियाचा कूल कॅप्टन धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली. एम. एस. धोनीनेही आपल्या करियरमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सहा शतके केली आहेत. बांगलादेशविरूद्ध शत करत त्याने या विक्रमाची बरोबरी केली आहे. टीम इंडियाच्या प्रथम फलंदाजी करताना पहिल्य दिवसाखेर 339-6 धावा झाल्या असून अश्विन 102 धावांवर नाबाद तर रवींद्र जडेजा नाबाद 86 धावांवर खेळत आहे.
टीम इंडिया संकटात सापडली असताना आर अश्विन याने डाव सांभाळला. फक्त विकेट टिकवूनच खेळला नाहीतर त्याने धावाही केल्या. टीम इंडियाची अवस्था 144-6 अशी होती, त्यावेळी जडेजा आणि अश्विन यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. चेन्नईच्या चेपॉक येथे अश्विनचे कसोटी क्रिकेटमधील हे दुसर शतक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा भारताचा पाचवा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
टीम इंडिया प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग 11: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा