Video : हार्षित राणा आणि यशस्वी जयस्वालच्या खेळीने बेन डकेटचा खेळ खल्लास! 6 चौकार मारल्यानंतर असा गुंडाळला
भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी निवडली. या सामन्यात इंग्लंडने चांगली सुरुवात केली. फिल सॉल्ट आणि बेन डकेट या जो़डीने पहिल्या विकेटसाठी 75 धावांची खेळी केली. पण हार्षित राणा आणि यशस्वी जयस्वालच्या खेळीने डकेटचा खेळ संपला.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात डावखुऱा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि वेगवान गोलंदाज हार्षित राणा यांना पदार्पणाची संधी मिळाली. पण हार्षित राणाला सुरुवातीच्या सामन्यात काही सूर गवसला नाही. हार्षित राणाने पहिल्या षटकात 11 धावा दिल्या. त्यानंतर दुसरं षटक निर्धाव टाकलं आणि इंग्लंडवर आपलं वजन टाकलं. पण फिलिप सॉल्टने तिसऱ्या षटकात हार्षित राणाला झोडला. एका षटकात 26 धावा ठोकल्या. तीन षटकार आणि दोन चौकार मारले. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माने स्पेल बदलला. त्यामुळे वनडेमधील पदार्पण हार्षित राणासाठी तसं काही चांगलं गेलं नव्हतं. पण संघाचं दहावं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा रोहित शर्माने हार्षित राणावर विश्वास टाकला. हार्षित राणाने या षटकात कमाल केली. पहिल्या दोन चेंडूवर प्रत्येक एक धाव दिली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर हार्षित राणाने डकेटची विकेट काढली. डकेटने जोरदार प्रहार केला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू खूप वर चढला. तिथपर्यंत यशस्वी जयस्वाल उलटा धावत त्या चेंडूखाली आला आणि झेल पकडला. उडी मारत अप्रतिम झेल घेतला. या झेलचं कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे हार्षित राणा आणि यशस्वी जयस्वाल यांचा पहिला वनडे सामना आहे. या वनडे सामन्यात डकेटची विकेट दोघांसाठी खास राहिली. हार्षित राणाची वनडेतील ही पहिली विकेट होती. तर यशस्वी जयस्वालचा वनडे क्रिकेटमधील हा पहिला झेल होता. त्यामुळे दोघांसाठी ही विकेट खास राहिली. बेन डकेटने 6 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या आणि बाद झाला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा हार्षित राणाला एक विकेट मिळाली. त्याने हॅरी ब्रूकची विकेट काढली. हॅरी ब्रूकने तीन चेंडूंचा सामना केला. मात्र त्याला आपलं खातही खोलता आलं नाही. त्यामुळे अधीच्या षटकात 26 धावा देऊनही हार्षित राणाने जोरदार कमबॅक केलं.
REMARKABLE FROM THE DEBUTANT YASHASVI JAISWAL 🥶 pic.twitter.com/yHTPIBmAXV
— Johns. (@CricCrazyJohns) February 6, 2025
INDIAN FIELDING IN NAGPUR 💪
– Shreyas 🤝 Jaiswal…!!!! pic.twitter.com/91XYRBTj63
— Johns. (@CricCrazyJohns) February 6, 2025
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (डब्ल्यू), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.