IND vs ENG : “मी तुम्हाला इथेच…”, कॅप्टन सूर्यकुमार पत्रकार परिषदेत असं का म्हणाला?
Suryakumar Yadav Press Conference : पत्रकार परिषदेत कायमच हसतमुख चेहऱ्याने प्रश्नांची उत्तर देणाऱ्या सूर्यकुमार यादव याला वर्ल्ड कपबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर कॅप्टन सूर्याने काय म्हटलं?

भारतीय क्रिकेट संघ मायदेशात 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादवची सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद पार पडली. सूर्याला या दरम्यान 2026 साली होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. सूर्याने या प्रश्नावर विनोदीरित्या उत्तर दिलं, त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. सूर्याला नक्की काय प्रश्न विचारण्यात आला आणि त्याने काय उत्तर दिलं? हे जाणून घेऊयात.
तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा उपकर्णधार अक्षर पटेल यानेही माध्यमांशी संवाद साधला. “टी 20 वर्ल्ड कप 1 वर्षानेच होणार आहे. त्यामुळे आम्ही वर्ल्ड कपपर्यंत कसे पोहचू शकतो, हे जाणून घेऊ इच्छितो. हेच आमचं प्रमुख ध्येय आहे. सर गवसणं फार महत्त्वाचं आहे, कारण एकदा चांगली सुरुवात केली तर तसेच पुढे जाऊ शकतो. आम्ही 2024 चा शेवट फार चांगला केला. त्यामुळे आम्हाला या मालिकेतही तसंच खेळायचा आहे”, असं अक्षरने म्हटलं.
“सर्व रहस्य इथेच सांगू काय?”
सूर्यकुमार यादवला या टी 20 वर्ल्ड कपपर्यंतच्या प्रवासाचा आनंद लुटायचा आहे. तसेच या टी 20 वर्ल्ड कपसाठी संघाची मोट बांधणार असल्याचं सूर्याने सांगितलं. “मी तुम्हाला सर्व रहस्य सांगू काय? मी या प्रवासाचा आनंद घेऊ इच्छितो. आम्हाला टीम तयार करायची आहे. कोण कुठे खेळणार हे निश्चित करायचं आहे. एक ग्रुप म्हणून सर्वाधिक सामने खेळायचे आहेत. त्यासाठी मी गौती भाई (हेड कोच गौतम गंभीर) यावर लक्ष केंद्रीत करत आहोत”, असं सूर्याने म्हटलं.
पहिल्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथल, जेमी ओव्हरटन, गस एटकीन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.