AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसरा कसोटी सामना संपण्यापूर्वीच सिराजला दणका, पुढे खेळणार की नाही? असा आहे नियम

भारत आणि इंग्लंड तिसरा कसोटी सामन्याचा आज निकाल लागणार यात काही शंका नाही. पण कोण जिंकणार हे सांगणं कठीण आहे. कारण भारताकडे सहा विकेट असून अजूनही 135 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. असं असताना भारताला एक दणका बसला आहे.

तिसरा कसोटी सामना संपण्यापूर्वीच सिराजला दणका, पुढे खेळणार की नाही? असा आहे नियम
तिसरा कसोटी सामना संपण्यापूर्वीच सिराजला दणका, पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? असा आहे नियमImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 14, 2025 | 3:24 PM
Share

मोहम्मद सिराज याचा सामन्यातील कामगिरीपेक्षा उत्साह दाखण्याचा मोह असतो. आतापर्यंत त्याने मैदानात अनेकदा आक्रमकता दाखवली आहे. असंच काहीसं त्याने लॉर्ड्स कसोटी सामन्यात केलं. पण यावेळी त्याने सर्व मार्यादा ओलांडल्या. दुसऱ्या डावात बेन डकेटला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराज जास्तच आक्रमक झाला. इतक्यावरच थांबला नाही तर त्याच्या जवळ जाऊन तोंडावर ओरडू लागला. तसेच खांदाही मारला. त्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याला आयसीसी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. यासाठी त्याच्या सामना फीमधून 15 टक्के रक्कम कापली आहे. इतकंच नाही तर एक डिमेरीट पॉइंटही दिला आहे. त्यामुळे त्याचे दोन डिमेरीट पॉइंट झाले आहेत. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली जाऊ शकते. काय आहे आयसीसी डिमेरिट पॉइंट नियम…

मोहम्मद सिराजवर बंदीची टांगती तलवार आहे. आयसीसीच्या डिमेरिट पॉइंट सिस्टममुळे त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. मोहम्मद सिराजचे दोन डिमेरिट पॉइंट झाले आहेत आणि दोन डिमेरिट पॉइंट असतील तर 24 महिन्यांसाठी त्याच्यावर बंदी घातली जाऊ शकते. कोणताही खेळाडू लेव्हल 1 मध्ये दोषी आढळला तर क-2 डिमेरिट पॉइंट्स मिळतात. जर हे डिमेरिट पॉइंट्स 3-4 झाले तर त्या खेळाडूवर एक कसोटी सामन्यासाठी किंवा दोन एकदिवसी-टी20 सामन्यासाठी बंदी घातली जाऊ शकते. म्हणजेच सिराजने पुन्हा लॉर्ड्ससारखी चूक केली तर त्याला शिक्षा भोगावी लागेल. तसेच त्याची मॅच फी देखील कापली जाईल.

मोहम्मद सिराज पहिल्या कसोटी सामन्यात महागडा ठरला होता. त्याच्या पदरात फक्त दोन विकेट पडल्या होत्या. मात्र उर्वरित दोन कसोटी सामन्यात त्याने चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला होता. तर लॉर्ड्स कसोटीतही त्याने दोन्ही डावात चांगली गोलंदाजी केली. पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावातही 2 विकेट घेतला आहे.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.