AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | रोहित शर्माच्या ‘त्या’ वक्तव्याची दिल्ली पोलिसांकडून दखल, नेमका काय विषय?

Dehli police on rohit sharma : टीम इंडिया आणि इंग्लंड मालिकेमधील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यामध्ये टीम इंडियाने पाच विकेटने विजय मिळवला. रांचीमध्ये झालेल्या सामन्यात रोहितच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. पोलिसांकडूनही याची दखल घेण्यात आली आहे.

IND vs ENG | रोहित शर्माच्या 'त्या' वक्तव्याची दिल्ली पोलिसांकडून दखल, नेमका काय विषय?
| Updated on: Feb 27, 2024 | 4:27 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच सामन्यांची मालिका आता इंग्लिश संघाने खिशात घातली आहे. चौथा कसोटी सामनाही टीम इंडियाने पाच विकेटने जिंकत इंग्लंडला पराभूत केलं आहे. युवा खेळाडूंनी केलेली कामगिरी या सामन्यात पाहण्यासारखी होती. पदार्पणवीर वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि दुसरा कसोटी सामना खेळणारा ध्रुव जुरेल यांची मॅचविनिंग खेळी सामना पालटवणारी ठरली. कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने इंग्लंड संघाला पराभवाची धूळ चारली. मात्र रोहित आता वेगळ्याचं कारणाने चर्चेत आला आहे. रोहित शर्मा याने केलेल्या वक्तव्याची दिल्ली पोलिसांनी दखल घेतली आहे. नेमकं काय कारण जाणून घ्या.

चौथ्या कसोटी सामन्यामध्ये रोहित शर्मा याने सर्फाराज खान याला चालू सामन्यात झापलं होतं. रोहितने मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्याला झापलेलं पाहायला मिळालं होतं. कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना इंग्लंडच्या फलंदाजाजवळच सर्फराज उभा होता. त्यावेळी त्याने हेल्मेट घातलं नव्हतं, तेव्हा रोहितने त्याला, भावा आपल्याला हिरो नाही व्हायचं, हेल्मेट घाल, असं म्हणत झापलं होतं.

दिल्ली पोलिसांकडून दखल

रोहितने एक कर्णधार म्हणून त्याची जबाबदारी पार पाडली. जवळ फिल्डिंगला थांबलं आणि चेंडू डोक्याला लागला तर जीवावर बेतू शकतं. त्यामुळे रोहितने सामना थांबवत हेल्मेट घालायला लावलं. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ शअर करत, टू- व्हीलर चालवताना हेल्मेट घालायचं, हिरो नाही बनायचं असं कॅप्शन दिलं आहे.

रोहित शर्माच्या व्हायरल व्हिडीओचा वापर करत दिल्ली पोलिसांनी सर्व टू-व्हीलर चालकांन  हेल्मेट वापरण्याचा संदेश दिला. दिल्ली पोलिसांनी एक्स (ट्विट) करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हे ट्विट जोरदार व्हायरल होत असलेलं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, टीम इंडियाने चौथा सामना जिंकत कसोटी मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. पाचवा कसोटी सामना जिंकत इंग्लंड संघाला घरी पाठवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. पाचव्या सामन्यात संघात  काही बदल केले जावू शकतात. रजत पाटीदार हा मधल्या फळीमध्ये अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे त्याच्या जागी संघात कोणाली संधी मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.