IND vs ENG : चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचं जबरदस्त कमबॅक, दिवसअखेर 7 बाद 302 धावा

भारत इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना रांचीत सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच पहिल्या दिवसावर मजबूत पकड मिळवली. त्यामुळे टीम इंडियाचा विजय वाटतो तितका सोपा नसेल हे मात्र खरं आहे. जो रूटने भारतीय गोलंदाजांना वेठीस आणलं.

IND vs ENG : चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचं जबरदस्त कमबॅक, दिवसअखेर 7 बाद 302 धावा
IND vs ENG : चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जो रूटने मूळं घट्ट रोवली, 300हून अधिक धावांचा डोंगर
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 4:51 PM

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात चौथा निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यावर मालिकेचं भविष्य अवलंबून आहे. भारताने हा सामना जिंकला तर पाच सामन्यांची मालिका थेट खिशात जाईल. अन्यथा आणखी एका सामन्यावर मालिकेचं भविष्य ठरेल. या सामन्यात नाणेफेकीत इंग्लंडच्या बाजूने कौल लागला. इंग्लंडने खेळपट्टीचा अंदाज घेऊन तात्काळ फलंदाजीची घोषणा केली. पण इंग्लंडच्या डावाची सुरुवात अडखळत झाली. पदार्पणाच्या सामन्यात आकाशदीपने जलवा दाखवला. एका पाठोपाठ एक आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद केलं. त्यामुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर आला होता. पण जो रूटने एकाकी झुंड सुरुच ठेवली आणि इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. जो रूटसमोर भारतीय गोलंदाजांची हतबलता दिसून आली. खासकरून जसप्रीत बुमराहची उणीव भासली. इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर 7 गडी गमवून 302 धावा केल्या. या मोलाची साथ लाभली ती जो रूटच्या शतकाची..

झॅक क्राउली आणि बेन डकेट या जोडीने सावध सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी 47 धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात आकाशदीपला यश आलं. त्याने डकेटला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ओली पोपला आपलं खातंही खोलू दिलं नाही. त्याला पायचीत आला तसा माघारी पाठवलं. त्यानंतर झॅक क्राउलीची त्रिफळा उडवून संघाला बॅकफूटवर आणलं. पण जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी चांगली भागीदारी केली. दोघांनी 52 धावांची पार्टनरशिप करत इंग्लंडचा डाव सावरला.

बेअरस्टो बाद झाल्यानंतर बेन स्टोक्सही काही खास करू शकला नाही. 3 धावा करून जडेजाच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर जो रुटला साथ लाभली ती बेन फोक्सची. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 113 धावांची भागीदारी केली. फोक्स बाद झाल्यानंतर टॉम हार्टलेही जास्त वेळ तग धरू शकला नाही. 13 धावा करून बाद झाला. जो रुटने एका बाजूने मोर्चा सांभाळला होता. त्याला ओली रॉबिनसनची साथ मिळाली. दिवसअखेर जो रूट नाबाद 106 धावांवर, तर ओली रॉबिनसन नाबाद 31 धावांवर खेळत आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.