IND vs ENG : गिलने गंभीरकडे शिफारस केली त्याच खेळाडूने केला घात, फक्त 4 चेंडूतच खेळ खल्लास

भारतासाठी इंग्लंड कसोटी मालिका ही मोठी परीक्षा आहे. खरं तर या मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे शुबमन गिलने प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळाडूंची पारखून निवड केली आहे. मात्र आयपीएल वंडर बॉयने पहिल्याच सामन्यात धक्का दिला.

IND vs ENG : गिलने गंभीरकडे शिफारस केली त्याच खेळाडूने केला घात, फक्त 4 चेंडूतच खेळ खल्लास
गौतम गंभीर आणि शुबमन गिल
Image Credit source: video grab
| Updated on: Jun 20, 2025 | 6:54 PM

भारतासाठी इंग्लंड कसोटी मालिका ही कठीण परीक्षा हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे शुबमन गिलला ताकही फुंकून प्यावा लागणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यापासून शुबमन गिलला सकारात्मक दृष्टीकोन ठेवणं भाग आहे. यासाठी त्याने प्लेइंग 11 ची विचारपूर्वक निवड केली आहे. आयपीएलमध्ये सलामीला साथ देणाऱ्या साई सुदर्शनची संघात निवड केली. इतकंच काय तर प्लेइंग 11 मध्येही स्थान दिलं. आयपीएलमध्ये आक्रमक खेळी करणारा साई सुदर्शन पदार्पणाच्या सामन्यातच फेल गेला. पहिल्या डावात त्याने चार चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातं न खोलता तंबूत परतावं लागलं. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने त्याला बरोबर जाळ्यात अडकवलं आणि साई सुदर्शन लेग स्लिपला झेल देऊन बाद झाला. रणनितीनुसार, स्टोक्सने लेग साईडला फिल्डिंग सेट करून ठेवली होती. त्यामुळे स्टोक्स लेग साईडला गोलंदाजी करत होता. साई सुदर्शने तिथेच चूक केली आणि जेमी स्मिथच्या हाती झेल देऊन बाद झाला.

सामना सुरु होण्यापूर्वी अनुभवी चेतेश्वर पुजाराने साई सुदर्शनच्या हाती कॅप सोपवली होती. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 317 वा भारतीय खेळाडू ठरला. पण पदार्पणाच्या सामन्यातच त्याला अपयश आलं. योगायोग म्हणजे भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये 20 जून या दिवशी राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी पदार्पण केलं होतं. तसेच विराट कोहलीनेही 2011 मध्ये या तारखेला पहिला कसोटी सामना खेळला होता. आता दुसऱ्या डावात कशी कामगिरी करतो याकडे लक्ष असेल.

शून्यावर बाद झालेला भारताचे शेवटचे 10 कसोटी खेळाडू

पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झालेल्या खेळाडूंमध्ये आता साई सुदर्शनची भर पडली आहे. साईराज बहुतुले (2001),अजय रात्रा (2002), पार्थिव पटेल (2002), वृद्धिमान साहा (2010), प्रवीण कुमार (2011), आर अश्विन (2011), उमेश यादव (2011), जसप्रीत बुमराह (2018), हनुमा विहारी (2018) आणि साई सुदर्शन (2025) असे शून्यावर बाद झालेले शेवटचे 10 कसोटी खेळाडू आहेत. सात वर्षानंतर पदार्पणाच्या सामन्यात भारतीय खेळाडू शून्यावर बाद झाला आहे.