AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : हवेत झेपावत विराट कोहलीची एक हाती शानदार कॅच, आदिल रशीद तंबूत

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे (Virat Kohli catch).

VIDEO : हवेत झेपावत विराट कोहलीची एक हाती शानदार कॅच, आदिल रशीद तंबूत
| Updated on: Mar 28, 2021 | 9:44 PM
Share

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. या अशा निर्णायक क्षणी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या आदिल रशीदची हवेत झेपावत एकहाती भन्नाट कॅच घेतला आहे. रशीदच्या रुपात इंग्लंडला आठवा धक्का बसला आहे. विराटने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 सॅम करन आणि आदिल रशीदची जोडी डोकेदुखी ठरली

इंग्लंडने 200 धावसंख्येवर मोईन अलीच्या रुपात सातवी विकेट गमावली. टीम इंडियाच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र मोक्याच्या क्षणी सॅम करन आणि आदिल रशीदने संयमी अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी झाली होती. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत होती.

विराटचा सुपर कॅच आणि रशीद आऊट

ही जोडी फोडणं टीम इंडिया समोरचं आव्हान होतं. सामन्यातील 40 वी ओव्हर विराटने शार्दुल ठाकूरला टाकायला दिली. शार्दुलने विराटचा विश्वास खरा ठरवला. या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर रशीदने फटका मारला. रशीदने मारलेला फटका विराटच्या दिशेने गेला. पण विराट आणि चेंडू यांच्यातील अंतर बरेच लांब होतं. पण विराट आपल्या नेहमीच्या शैलीत हवेत झेपावला. चेंडूवर अचूक नजर ठेवत कॅच पकडला. यासह इंग्लंडला आठवा धक्का बसला. रशीदने 22 चेंडूत 19 धावा केल्या.

विराटने कसा कॅच पकडला ? पाहा व्हिडीओ

इंग्लंडच्या डावाची खराब सुरुवात

दरम्यान, भारताने दिलेल्या 330 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जेसन रॉयला भुवनेश्वर कुमारने त्रिफळाचीत केलं. जेसन रॉयने 6 चेंडूत 14 धावा केल्या. यामध्ये 3 चौकारांचा समावेश आहे. जेसन रॉय बाद झाल्यानंतर लगेच तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारने जॉनी बेयरस्टोला पायचीत केलं.

बेयरस्टो अवघ्या एक धावावर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, शार्दूल ठाकूरने त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरवला. त्याने जोस बटलरला पायचीत करत तंबूत परत पाठवले. बटलरने 18 चेंडूत 15 धावा केल्या. त्यानंतर मलान आणि लिविंग्स्टोन यांनी डाव सावरला. दोघांनी संयमी खेळी सुरु ठेवली. पण शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर लिविंग्स्टोनही झेलबाद झाला. त्याने 31 चेडूत 36 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार आणि 1 षटकाचा समावेश आहे.

लिविंग्स्टोन नंतर शार्दूलने मलानचा देखील बळी घेतला. मलानने 50 चेंडूत 50 धावा केल्या. यामध्ये सहा चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर मोईन अलीने सॅम करनच्या मदतीने डाव सावरला. पण भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. हार्दिक पांड्याने एकदम अचूकपणे त्याचा झेल टिपल्याने तो बाद झाला. मोईनने 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 25 चेंडूत 29 धावा केल्या.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.