AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध पराभव होताच अभिषेक शर्माने उणीव सांगितली, चूक सुधारली नाही तर..

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडने भारताला 34 धावांनी पराभूत केलं. या पराभवानंतर टीम इंडियावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. असं असताना अभिषेक शर्माने काय चुकलं ते सांगून टाकलं.

IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध पराभव होताच अभिषेक शर्माने उणीव सांगितली, चूक सुधारली नाही तर..
IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध पराभव होताच अभिषेक शर्माने उणीव सांगितली, चूक सुधारली नाही तर.. Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 27, 2026 | 5:36 PM
Share

आयर्लंडसारख्या दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाने टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला दणका दिला आहे. त्यामुळे मालिका विजय सोडा, आता मालिका वाचवण्याची वेळ टीम इंडियावर आहे. दुसरा टी20 सामना जिंकला तरच ही मालिका 1-1 ने बरोबरीत सुटणार आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात केलेल्या चुका सुधारण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे. बेलफास्टमध्ये टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात आयर्लंडने टीम इंडियाला 34 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात फक्त अभिषेक शर्माची बॅट तेवढी चालली. त्याने आयर्लंडच्या गोलंदाजांना धुवून काढलं. पण त्याच्या फलंदाजीच्या जोरावरही टीम इंडियाला काही विजय मिळवता आला नाही. आयर्लंडने विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडिया 148 धावांवरच सर्वबाद झाली. त्यामुळे आयर्लंडविरुद्ध क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पराभूत होण्याची नामुष्की ओढावली.

अभिषेक शर्माने सांगितलं काय चुकलं?

टीम इंडियाला 182 धावांचा पाठलाग करणं काही जमलं नाही म्हणून फलंदाजांवरच खापर फुटलं. पण अभिषेक शर्माने फलंदाजी नाही तर गोलंदाजीमुळे पराभूत झाल्याचं सांगितलं. अभिषेक शर्माने सांगितलं की, ‘एक बॉलिंग युनिट म्हणून त्यांनी ज्या भागात गोलंदाजी केली ती आमच्यापेक्षा चांगली होती. एक टीम म्हणून तुम्ही असंच शिकता. आम्हाला या सामन्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून शिकायला मिळालं.’ अभिषेक शर्माने पुढे सांगितलं की, आयर्लंडमध्ये थंड वातावरण असून भारतीय संघाला ते भावलं. कारण मागच्या तीन महिन्यांपासून खेळाडू उकाड्यात खेळत होते. पण असं असूनही वातावरणाशी काही जुळवून घेता आलं नाही. त्याचा परिणाम झाला. इतकंच काय तर बेलफास्टची खेळपट्टी देखील भारतीय खेळपट्ट्यांपेक्षा वेगळी होती.

भारतीय गोलंदाजांनी या चुका केल्या!

अभिषेक शर्माने भारतीय गोलंदाजांबाबत थेट असं काही बोललं नाही तर त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. बेलफास्टमधील मैदान डाव्या आणि उजव्या बाजूला मोठं होतं. पण मागच्या आणि पुढच्या भागात जवळ होतं. या ठिकाणी भारतीय गोलंदाजांनी चूक केली. आयर्लंडच्या फलंदाजांना सरळ मारण्याची अधिक मिळाली. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारता आली. त्यांनी फक्त दोन षटकात 46 धावा ठोकल्या. जर चेंडू थोडा लांब आणि आखुड टप्प्याचा ठेवला असता तर सरळ मारणं कठीण गेलं असतं. तसेच फटकेबाजी करताना विकेट पडल्या असत्या. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंगने असं केलं. पण प्रसिद्ध कृष्णा आणि वॉशिंग्टन सुंदर तसं करण्यात अपयशी ठरले.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...