INDvsNZ, 1st ODI | टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे बाहेर झाल्याने टीम इंडियाच्या गोटात नाराजीचं वातावरण होतं. मात्र आता टीम इंडियाला आणि चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी मिळाली आहे.

INDvsNZ, 1st ODI | टीम इंडियासाठी आनंदाची बातमी
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 9:06 PM

हैदराबाद : टीम इंडियाने श्रीलंकेला टी 20 आणि एकदिवसीय मालिकेत लोळवलं. त्यानंतर आता न्यूझीलंडची पाळी आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी सज्ज आहे. वनडे सीरिजमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर त्यानंतर हार्दिक पांड्याकडे टी 20 सीरिजची सूत्रं आहेत.

टीम इंडियाच्या मिशन न्यूझीलंडला 18 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. 3 सामन्यांमधील पहिला सामना हा हैदराबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. सामना दुपारी दीड वाजता सुरु होणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यातून टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाची एन्ट्री होणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये या फलंदाजाला संधी देणार आहे. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून सूर्यकुमार यादव आहे. श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे श्रेयसच्या जागी रजत पाटीदारचा समावेश करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र रोहितने त्याऐवजी सूर्याला संधी दिली आहे. सूर्याने श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत शतक ठोकलं होतं. मात्र श्रेयसला संधी मिळावी यासाठी सूर्याचा वनडे सीरिजच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला नाही. मात्र आता श्रेयसच्या अनुपस्थितीत सूर्याला संधी मिळणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

टीम न्यूझीलंड

टॉम लॅथम (कॅप्टन/विकेटकीपर), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन आणि हेन्री शिपली.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 18 जानेवारी, हैदराबाद

दुसरा सामना, 21 जानेवारी, रायपूर

तिसरा सामना, 24 जानेवारी, इंदूर

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.