IND vs NZ : रायपूरमधील दुसऱ्या टी 20I सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?

India vs New Zealand 2nd T20i Live Streaming : नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात झाली होती. जाणून घ्या रायपूरमधील सामन्यात पहिला बॉल किती वाजता टाकण्यात येणार.

IND vs NZ : रायपूरमधील दुसऱ्या टी 20I सामन्याच्या वेळेत बदल? किती वाजता सुरुवात होणार?
Bumrah Arshdeep Rinku Team India
Image Credit source: Bcci
| Updated on: Jan 22, 2026 | 11:36 PM

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-2 ने गमावली. मात्र भारताने त्यानंतर टी 20i मालिकेत जोरदार मुसंडी मारली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पहिल्या सामन्यात 48 धावांनी लोळवलं. भारताने न्यूझीलंडला नागपूरमध्ये पराभूत करत 2016 मधील पराभवाची परतफेड केली. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. त्यामुळे आता टीम इंडियाचा ही विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. उभयसंघातील दुसरा सामना हा कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20I सामना कधी?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20I सामना शुक्रवारी 23 जानेवारीला होणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20I सामना कुठे?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20I सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20I सामना टीव्हीवर स्टार स्पोर्टस् नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20I सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.

इशान किशन-संजू सॅमसनसमोर आव्हान काय?

दरम्यान दुसऱ्या टी 20I सामन्यात भारताच्या इशान किशन आणि संजू सॅमसन या विकेटकीपर जोडीवर कमबॅक करत तडाखेदार खेळी करण्याचं आव्हान असणार आहे. पहिल्या सामन्यात इशान आणि संजू या दोघांना त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. संजू नागपूरमध्ये 10 तर इशान 8 धावांवर आऊट झाला होता. त्यामुळे आता हे दोघे रायपूरमध्ये कशी कामगिरी करतात याकडे टीम मॅनेजमेंटचंही लक्ष असणार आहे.