AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : विराट कोहलीचं इंदूरमध्ये जबरदस्त शतक, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, दोघांना पछाडलं

Virat Kohli World Record : विराट कोहली याने टीम इंडिया अडचणीत असताना 2026 मधील पहिलं शतक झळकावलं. विराटने या शतकासह भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे विराट भारताला विजयी करणार का? याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागून आहे.

IND vs NZ : विराट कोहलीचं इंदूरमध्ये जबरदस्त शतक, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, दोघांना पछाडलं
Virat Kohli Century IND vs NZImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 18, 2026 | 10:35 PM
Share

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात चिवट आणि झुंजार शतक झळकावलं आहे. विराटने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 338 धावांचा पाठलाग करताना आणि भारतीय संघ अडचणीत असताना हे निर्णायक शतक ठोकलंय. विराटच्या या शतकामुळे भारताच्या विजयाचा आशा कायम आहेत. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे विराट भारतीय संघाला शतकी खेळीनंतर आता सामन्यासह मालिका जिंकून देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विराटचं झुंजार शतक

विराटने 40 व्या ओव्हरमधील सहाव्या अर्थात शेवटच्या बॉलवर 1 धाव घेतली. यासह विराटने शतक पूर्ण केलं. विराटने शतकापर्यंत पोहचण्यासाठी 91 चेंडूंचा सामना केला. तसेच विराटने या शतकी खेळीत 2 सिक्स आणि 8 फोर लगावले. विराटचं हे एकदिवसीय क्रिकेटमधील 54 वं तर न्यूझीलंड विरुद्धचं सातवं शतक ठरलं. तसेच विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील हे 85 वं शतक ठरलं.

विराट दुसराच भारतीय

विराटचं 2026 वर्षातील हे पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. विराटला न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात रविवारी 11 जानेवारीला शतक करण्याची संधी होती. मात्र विराटची ही संधी अवघ्या 7 धावांनी हुकली होती. विराट त्या सामन्यात 93 धावांवर बाद झाला होता. मात्र विराटने इंदूरमध्ये पहिल्या सामन्यातील चूक सुधारत धावांची शंभरी गाठली. विराट यासह नववर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला. भारतासाठी केएल राहुल याने 2026 मध्ये पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय आणि एकदिवसीय शतक ठोकलं. केएलने न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या वनडेत ही कामगिरी केली होती.

रेकॉर्डवीर विराट कोहली

कोहलीची विराट कामगिरी, वर्ल्ड रेकॉर्ड उद्धवस्त

दरम्यान विराट कोहली याने शतकासह इतिहास घडवला आहे. विराट यासह न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकं करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. इंदूरमधील तिसऱ्या सामन्याआधी न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम हा संयुक्तरित्या वीरेंद्र सेहवाग, रिकी पॉन्टिंग आणि विराट यांच्या नावावर होता. या तिघांनीही न्यूझीलंड विरुद्ध प्रत्येकी 6-6 एकदिवसीय शतकं झळकावली होती. मात्र विराटने इंदूरमध्ये शतक पूर्ण करताच या दोघांना मागे टाकलं आणि वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा
जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते...; बावनकुळेंचा ठाकरेंवर निशाणा.
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका
चाकरी सिल्व्हर ओकची, भाकरी खाल्ली.., शीतल म्हात्रेंची राऊतांवर टीका.
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश
बदलापूरात शिंदेंच्या शिवसेनेला धक्का! उपशहरपप्रमुखांचा भाजपात प्रवेश.
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर
रोहित पवारांनी घेतली अजितदादांची भेट! मोठं कारण आलं समोर.
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?.
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स
मुंबईत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी शिंदेंचं हॉटेल पॉलिटिक्स.
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न
केडीएमसीत शिंदेंडेकडून ठाकरेंचे 3 नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न.
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान
हार-जीत खुल्या मनाने मान्य...; रूपाली चाकणकरांचं मोठं विधान.
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?
पिंपरी-चिंचवड पालिका निवडणुकीत क्रॉस वोटिंग? व्हायरल क्लिपचं सत्य काय?.
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल
राहुल नार्वेकरांनी पदाची गरिमा राखली नाही; सपकाळ यांचा हल्लाबोल.