AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ, CT 2025 Final : भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची अशी असू शकते प्लेइंग 11, जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीचा थरार भारत आणि न्यूझीलंड या संघात रंगणार आहे. अवघ्या काही तासानंतर जेतेपदावर मोहोर लागणार आहे. या स्पर्धेत कोण विजयी ठरणार याची उत्सुकता आहे. तसेच कोणते खेळाडू प्लेइंग 11 मध्ये असतील याचीही उत्सुकता आहे.

IND vs NZ, CT 2025 Final : भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची अशी असू शकते प्लेइंग 11, जाणून घ्या
भारत न्यूझीलंडImage Credit source: New Zealand Twitter
| Updated on: Mar 08, 2025 | 4:12 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेचं जेतेपद मिळवण्याची मोठी संधी रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला चालून आली आहे. आता या संधीचं सोनं करण्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियानंतर सर्वाधिक त्रास कोणी दिला असेल तर तो न्यूझीलंडने.. चॅम्पियन्स ट्रॉफी 2000 स्पर्धा असो की पहिली वहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप..दोन्ही अंतिम फेरीत न्यूझीलंडने भारताच्या स्वप्नांवर पाणी टाकलं आहे. आता पुन्हा एकदा भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आतापासूनच धाकधूक लागून आहे. भारताने या स्पर्धेच्या साखळी फेरीत न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा उडवला आहे. त्यामुळे भारताला अंतिम फेरीत हा पेपर वाटतो तितका सोपा नसेल असं दिग्गज सांगत आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात आपलं सर्वस्वी पणाला लावावं लागणार आहे. इतकंच काय तर या सामन्यात नाणेफेकीचा कौलही महत्त्वाचा ठरणार आहे.

रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग निवडताना हार्षित राणाला संघाबाहेरच ठेवेल असं दिसत आहे. कारण मागच्या दोन सामन्यात भारताने फिरकीच्या जोरावर चांगली कामगिरी केली आहे. इतकंच काय तर वरुण चक्रवर्ती चांगला फॉर्मात आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे रोहित शर्मा पुन्हा एकदा प्लेइंग 11 मध्ये वरुण चक्रवर्तीला स्थान देईल यात काही शंका नाही. दरम्यान भारत आणि न्यूझीलंड हे संघ वनडे सामन्यात 119 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 61, तर न्यूझीलंडने 50 वेळा विजय मिळवला आहे. तर 7 सामन्यांचा निकाल लागला नाही. एक सामना बरोबरीत सुटला आहे.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारताची संभाव्य प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल , विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल , केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या , रवींद्र जडेजा , मोहम्मद शमी , कुलदीप यादव , वरुण चक्रवर्ती.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग 11: विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन , डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओ’रोर्क.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.