IND vs NZ : भारत-न्यूझीलंड महाअंतिम सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर, टीमला मोठा झटका
India vs New Zealand Final Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यातून स्टार खेळाडूला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं आहे.जाणून घ्या कोण आहे तो?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा इथेही दुर्देवी ठरला. न्यूझीलंडने म्हत्त्वाच्या सामन्यात टॉस जिंकला. कर्णधार मिचेल सँटनर याने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडला महाअंतिम सामन्यात मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडचा मॅचविनर खेळाडू मॅट हेनरी याला दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागलं आहे. कर्णधार मिचेल सँटनर याने टॉस दरम्यान याबाबतची माहिती दिली.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरी याला खांद्याच्या दुखापतीमुळे फायनलमधून बाहेर व्हावं लागलं आहे. मॅटला दुखापतीमुळे हा सामना खेळता येणार नाही. मॅट बाहेर झाल्याने टीम इंडियाला हा सर्वात मोठा दिलासा आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ महाअंतिम सामन्याआधी 2 मार्चला साखळी फेरीत आमनेसामने भिडले होते. टीम इंडियाने तो सामना जिंकला होता. तसेच मॅट हेनरी याने या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच मॅटने या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या.
नॅथन स्मिथबाबत थोडक्यात
दरम्यान मॅट हेनरीच्या जागी संधी मिळालेल्या 26 वर्षीय नॅथन स्मिथ याला फक्त 8 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. मॅटने या 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत. नॅथन या सामन्यात कशी कामगिरी करतो? याकडे टीम मॅनजमेंटचं लक्ष असणार आहे.
मॅच हेनरी खांद्याच्या दुखापतीमुळे अंतिम सामन्यातून बाहेर
🚨 MATT HENRY RULED OUT OF THE CT FINAL VS INDIA. 🚨
– Nathan Smith has replaced Henry. pic.twitter.com/qISP6HvE0K
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 9, 2025
टीम इंडिया इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, कायल जेमिसन, विल्यम ओरुर्के आणि नॅथन स्मिथ
