AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : नागपुरात सूर्यासेनेच्या पहिल्या टी 20i सामन्याचा थरार, चाहत्यांची तिकीटसाठी तोबा गर्दी

India vs New Zealand 1st T20i VCA Stadium: क्रिकेट चाहत्यांना सामन्यानिमित्ताने आपल्या लाडक्या खेळाडूंना प्रत्यक्ष पाहायची संधी मिळते. चाहत्यांना या संधीसाठी तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. याचा प्रत्यय नागपुरातील चाहत्यांना आलाय.

IND vs NZ : नागपुरात सूर्यासेनेच्या पहिल्या टी 20i सामन्याचा थरार, चाहत्यांची तिकीटसाठी तोबा गर्दी
Suryakumar Yadav Team India CaptainImage Credit source: PTI
| Updated on: Jan 20, 2026 | 7:48 PM
Share

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी 20I सामन्याला मोजून काही तास बाकी आहे. उभयसंघातील या टी 20I मालिकेत एकूण 5 सामने होणार आहेत. त्यातील सलामीचा सामना हा नागपूरमधील व्हीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. भारताच्या नववर्षातील पहिल्याच टी 20I सामन्याचा मान हा व्हीसीए स्टेडियमला मिळाला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेआधी होणाऱ्या शेवटच्या मालिकेतील पहिला सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. चाहत्यांची या सामन्याच्या तिकीटांसाठी स्टेडियम परिसरात एकच गर्दी पाहायला मिळाली.

क्रिकेट चाहत्यांचा तिकीटासाठी रांगा

बीसीसीआयकडून क्रिकेट चाहत्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे तिकीट बुक करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार काही चाहत्यांनी आधीच ऑनलाईन तिकीटं मिळवली आहेत. आता ॲानलाईन बुकिंग केलेल्या चाहत्यांना नागपुरातील व्हीसीएम स्टेडियवर तिकीटांचं वितरण केलं जात आहे. चाहत्यांची तिकीट मिळवण्यासाठी एकच गर्दी पाहायला मिळत आहे. स्टेडियम परिसरात कडाक्याची थंडी असूनही सकाळपासून क्रिकेट रसिकांची तिकीटासाठी ही गर्दी पाहायला मिळत आहे.

संत्रानगरी अशी ओळख असलेलं नागपूर भारताच्या मध्यभागी आहे. त्यामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या तिकीटासाठी राज्यासह राज्याबाहेरतील चाहतेही रांगेत पाहायला मिळाले. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विविध राज्यातील चाहते तिकीटासाठी रांगेत उभे पाहायला मिळाले. व्हीसीएकडून गेल्या 3 दिवसांपासून तिकीट वाटप सुरु आहे.

भारतीय खेळाडूंची जंगल सफारी

भारतीय खेळाडूंनी पहिल्या टी 20I सामन्याआधी जंगल सफारीचा आनंद घेतला. भारताचे काही मोजक्या खेळाडूंना वाघोबा पाहण्यासाठी पेंचच्या जंगलात सफरीचा आनंद घेतला. टीम इंडियाचा विकेटकीपर संजू सॅमसन याने जंगल सफारीचा व्हीडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट केला आहे. संजूने पोस्ट केलेल्या या व्हीडिओत कॅप्टन सूर्याकुमार यादव याच्यासह विकेटकीपर इशान किशन, फिनिशर रिंकु सिंग आणि फिरकीपटू रवी बिश्नोई असल्याचं दिसत आहे.

इशान किशन तिसऱ्या स्थानी खेळणार

दरम्यान टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव यांनी तिलक वर्मा याच्या जागी श्रेयस अय्यरऐवजी इशान किशन याला संधी देण्याचं निश्चित केलं आहे. इशान किशन न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात तिसऱ्या स्थानी खेळणार असल्याचं कॅप्टन सूर्यकुमार यादव याने जाहीर केलं आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.