Team India | टीम इंडियासाठी वाईट बातमी, स्टार ओपनर आऊट

टीम इंडियाच्या मागे लागलेलं दुखापतीचं ग्रहण आणि त्यामुळे सामन्याला मुकण्याची मालिका कायम आहे. आता स्टार बॅट्समन सामन्यातून बाहेर पडला आहे. जाणून घ्या सविस्तर.

Team India | टीम इंडियासाठी वाईट बातमी, स्टार ओपनर आऊट
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 8:19 PM

केपटाऊन : मेन्स टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा नागपूर कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी तिसऱ्यात दिवशी पराभव केला. टीम इंडियाने यासह कसोटी मालिकेची विजयी सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडियाच्या टी 20 वर्ल्ड कप मोहिमेतील सुरुवात 12 फेब्रुवारीपासून होत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. वूमन्स टीम इंडियाचे कोच ऋषिकेश कानिटकर यांनी ही माहिती दिली आहे.

स्मृती मंधाना हिला टी 20 वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात दुखापत झाली. स्मृती ज्यातून अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे स्मृतीला पाकिस्तान विरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात खेळता येणार नाही. भारत-पाक यांच्यात रविवारी केपटाऊमध्ये सामना खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडियाचे कोच कानिटकर यांनी 11 पत्रकार परिषदेत स्मृतीबाबत ही माहिती दिली. स्मृतीसह हरमनप्रीत कौर हिच्या फिटनेसबाबत शंका होती. हरमनप्रीतला त्रिपक्षीय मालिकेत खांद्याला दुखापत झाली होती.

हे सुद्धा वाचा

कोच कानिटकर काय म्हणाले?

“हरमन खेळण्यासाठी पूर्णपणे फीट आहे. हरमनने गेल्या 2 दिवसांपासून नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. ती पूर्णपणे ठीक आहे. स्मृतीच्या अंगठ्याला दुखापत आहे.तिचं खेळणं जवळपास अशक्य आहे”, असं कानिटकर म्हणाले.

“स्मृतीला कोणतही फ्रॅक्चर नाही. त्यामुळे आम्हाला आशा आहे की स्मृती दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल”, असा आशावादही कानिटकर यांनी व्यक्त केला. टीम इंडिया वर्ल्ड कपमधील दुसरा सामना 15 फेब्रुवारीला विंडिज विरुद्ध खेळणार आहे.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान, 12 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध विंडिज, 15 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड, 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, 20 फेब्रुवारी, संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी.

भारतीय संघ – हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग आणि शिखा पांडे.

पाकिस्तानी संघ- अयेशा नसीम, जवेरिया खान, सदाफ शाम्स, सिद्रा अमीन, अलिया रियाझ, बिस्माह मरुफ (कर्णधार), फातिमा साना, निदा दार, ओमैमा सोहेल, मुनीबा अली, सिद्रा नवाज, एमन अनवर, डायना बैग, घुलाम फातिमा, कैनत इम्तियाझ, नाश्रा संधू, सादिया इकबाल आणि तुबा हस्सन.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.