AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yashasvi Jaiswal च्या कसोटी कारकीर्दीला मोठा डाग, ओपनरसोबत पहिल्यांदाच असं घडलं

Yashasvi Jaiswal Duck : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे फलंदाज अपयशी ठरले. यशस्वीला दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही.

Yashasvi Jaiswal च्या कसोटी कारकीर्दीला मोठा डाग, ओपनरसोबत पहिल्यांदाच असं घडलं
Yashasvi jaiswal DuckImage Credit source: PTI
| Updated on: Nov 16, 2025 | 2:11 PM
Share

टीम इंडियाचा युवा आणि ओपनर बॅट्समन यशस्वी जैस्वाल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अपयशी ठरला. यशस्वी दोन्ही डावात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. उभयसंघातील पहिला सामना हा कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये करण्यात आलं आहे. यशस्वीने या सामन्यातील पहिल्या डावात 12 धावा केल्या. यशस्वीने पहिल्या डावात टिकून खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला फार वेळ मैदानात घालवता आला नाही. मार्को यान्सेन याने यशस्वीला बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसऱ्या डावात विजयी धावांचा पाठलाग करताना यशस्वीकडून भारतीय चाहत्यांना चांगली सुरुवात मिळवून देण्याची आशा होती. मात्र यशस्वीने दुसऱ्या डावात घोर निराशा केली. यशस्वीला दुसऱ्या डावात खातंही उघडता आलं नाही. यशस्वीच्या कसोटी कारकीर्दीला यासह मोठा डाग लागला. त्यामुळे यशस्वीला त्याच्या कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असा दिवस पाहावा लागला.

यशस्वी दुसऱ्या डावात सुपर फ्लॉप

कर्णधार टेम्बा बावुमा याच्या चिवट अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 124 धावांचं आव्हान ठेवलं. त्यामुळे केएल राहुल आणि यशस्वी या दोघांवर भारताला भक्कम अशी सुरुवात करुन देण्याची जबाबदारी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताला पहिल्याच षटकात पहिला झटका दिला. यशस्वी 4 चेंडू खेळून झिरोवर आऊट झाला. यशस्वीची यासह मायदेशात झिरोवर आऊट होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. यशस्वी याआधी मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. मात्र त्याने किमान 1 धाव तरी केली होती. यशस्वीने भारतात खेळलेल्या सर्व 12 कसोटी सामन्यांमध्ये किमान 1 धाव केली होती.

यशस्वीला दुहेरी फटका

यशस्वीची मायदेशात झिरोवर आऊट झाल्याने नाचक्की झालीच. सोबतच त्याचा परिणाम यशस्वीच्या सरासरीवरही झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी यशस्वीची सरासरी 51.65 अशी होती. मात्र झिरोवर आऊट झाल्यानंतर यशस्वीच्या सरासरीवर परिणाम झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, यशस्वीची सरासरी 50 च्या खाली आली आहे. यशस्वीची सरासरी 49.79 इतकी झाली आहे. त्यामुळे एका खेळीत अपयशी ठरल्याचा परिणाम कशाप्रकारे थेट कारकीर्दीवर होतो, हेच यातून स्पष्ट होतं.

यशस्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अपयशी

यशस्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये अपयशी राहिला आहे. यशस्वीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण 3 सामने खेळले आहेत. यशस्वीला या 3 सामन्यात मिळून 100 धावाही करता आल्या नाहीत. यशस्वीने 10.33 च्या साधारण सरासरीने 62 धावा केल्या आहेत.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.