AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : एडन मार्करमच्या शतकी खेळीत यशस्वी जयस्वालचं 57 धावांचं योगदान, पाहा काय केलं ते

India vs South Africa, 2nd ODI: भारत आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात एडन मार्करमने शतकी खेळी केली. खरं तर त्याचा खेळ 53 धावांवर आटोपला असता. पण त्याच्या शतकी खेळीत यशस्वी जयस्वालने हातभार लावला.

IND vs SA : एडन मार्करमच्या शतकी खेळीत यशस्वी जयस्वालचं 57 धावांचं योगदान, पाहा काय केलं ते
IND vs SA : एडन मार्करमच्या शतकी खेळीत यशस्वी जयस्वालचं 57 धावांचं योगदान, पाहा काय केलं ते Image Credit source: Getty Images
| Updated on: Dec 03, 2025 | 8:30 PM
Share

रायपूर वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 गडी गमवून 358 धावा केल्या आणि विजयासाठी 359 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेने सावध सुरुवात केली. क्विंटन डी कॉक स्वस्तात बाद झाल्यानंतर एडन मार्करम आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. तर एडन मार्करमने 98 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारत 110 धावा केल्या. खरं तर एडन मार्करमचा खेळ 53 धावांवरच आटोपला होता. पण यशस्वी जसस्वालच्या चुकीमुळे त्याने आणखी 57 धावा केल्या आणि 110 धावांची खेळी केली. त्याच्या शतकी खेळीत यशस्वी जयस्वालचं योगदान होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याने त्याचा सोपा झेल सोडला. त्याचा फटका पुढे टीम इंडियाला बसला.

यशस्वी जयस्वालच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे एडन मार्करमने पहिल्यांदाच भारताविरुद्ध वनडे शतक ठोकलं. संघाचं 18 षटकं टाकण्यासाठी केएल राहुलने कुलदीप यादवच्या हाती चेंडू सोपवला. पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर एडन मार्करमने दुसऱ्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने फटका मारला. खरं तर हा चेंडू यशस्वी जयस्वालच्या हातात सहज बसणारा होता. पण त्यात त्याने चूक केली आणि टीम इंडियाचं नुकसान झालं. कारण हा झेल पकडला असता तर दक्षिण अफ्रिकेवर दबाव वाढला असता. एडन मार्करमने त्यानंतर सावध खेळी केली आणि 88 चेंडूत 52 धावा आणखी करत शतक ठोकलं.

यशस्वी जयस्वाल झेल सोडण्यात माहिर आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. यापूर्वी इंग्लंड दौऱ्यात त्याने गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडवलं होतं. त्याच्या चुकांमुळे टीम इंडियाला अनेकदा भुर्दंड भरावा लागला आहे. त्यामुळे क्रीडारसिकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यशस्वी जयस्वाल झेल पकडायला कधी शिकणार? अशा तीव्र प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. हार्षित राणाच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने त्याचा झेल पकडला. एडन मार्करमची खेळी संपुष्टात आली. मार्करम अजून टिकला असता तर भारतीय गोलंदाजांना कठीण गेलं असतं हे देखील तितकंच खरं आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?