AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yashasvi Jaiswal : यशस्वीचं पहिल आणि ऐतिहासिक शतक, सचिन-धोनीला जमलं नाही ते करुन दाखवलं

Yashasvi Jaiswal IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 271 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली. यशस्वीने रोहित आणि विराटसह शतकी भागीदारी करत भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.

Yashasvi Jaiswal : यशस्वीचं पहिल आणि ऐतिहासिक शतक, सचिन-धोनीला जमलं नाही ते करुन दाखवलं
Yashasvi Jaiswal Maiden Odi CenturyImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Dec 06, 2025 | 11:30 PM
Share

टीम इंडियाने शनिवारी 6 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवला. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत होती. त्यामुळे तिसरा सामना आणि मालिका कोणता संघ जिकंणार? याकडे चाहत्यांची करडी नजर होती. मात्र यशस्वी जैस्वाल याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने सहज विजय मिळवला. भारताला विजयासाठी 271 धावांचं आव्हान मिळालं होतं. भारताने हे आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केलं.

कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा या जोडीने प्रत्येकी 4-4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला 270 धावांवर रोखण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर यशस्वी आणि रोहितने पहिल्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली. तर यशस्वीने विराटसह 116 धावांची नाबाद भागीदारी केली. यशस्वीने या दरम्यान चौथ्या एकदिवसीय डावांत शतक झळकावलं. यशस्वीचं हे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक ठरलं. यशस्वीने या शतकी खेळीसह इतिहास घडवला. यशस्वीने यासह ते करुन दाखवलं जे दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विराट महेंद्रसिंह धोनी या माजी दिग्गजांनाही करता आलं नाही.

यशस्वी जैस्वाल याने काय केलं?

यशस्वीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 121 बॉलमध्ये नॉट आऊट 116 रन्स केल्या. यशस्वीने या दरम्यान 111 बॉलमध्ये 10 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं. यशस्वी यासह तिन्ही फॉर्मेटमध्ये (टेस्ट+टी 20i+वनडे) शतक करणारा टीम इंडियाचा सहावा फलंदाज ठरला.

तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारे 6 भारतीय फलंदाज

सुरेश रैना

रोहित शर्मा

केएल राहुल

विराट कोहली

शुबमन गिल

यशस्वी जैस्वाल

यशस्वीआधी टीम इंडियासाठी एकूण 5 फलंदाजांनी तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करण्याची कामगिरी केली होती. तसेच अशी कामगिरी करणारा सुरेश रैना पहिला भारतीय होता. सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, शुबमन गिल आणि केएल राहुल या 5 भारतीयांनी तिन्ही फॉर्मटेमध्ये शतक केलं आहे.

यशस्वी जैस्वाल मॅन ऑफ द मॅच

यशस्वीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्‍या आणि निर्णायक सामन्यात 116 पैकी 60 रन्स मोठे फटके मारुन मिळवले. यशस्वीने या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार लगावले. यशस्वीला त्याच्या शतकी खेळीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ (POTM) पुरस्काराने गौरवण्यात आलं.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.