IND vs SA : कॅप्टन सूर्यकुमार यादव अहमदाबादमध्ये धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, मैदानात उतरताच होणार रेकॉर्ड

Most T20i Matche By Team India : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये टॉससाठी मैदानात येताच टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन सूर्यकुमार यादव महेंद्रसिंह धोनीला पछाडेल. सूर्या यासह भारतासाठी सर्वाधिक टी 20i सामने खेळणारा चौथा खेळाडू ठरेल.

IND vs SA : कॅप्टन सूर्यकुमार यादव अहमदाबादमध्ये धोनीला पछाडण्यासाठी सज्ज, मैदानात उतरताच होणार रेकॉर्ड
Suryakumar Yadav Team India
Image Credit source: @surya_14kumar X Account
| Updated on: Dec 18, 2025 | 9:55 PM

टी 20I टीम इंडियाचा कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादव याने आतपर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियाने सूर्याच्या नेतृत्वात आतापर्यंत एकही टी 20I मालिका गमावलेली नाही. सूर्याने कर्णधार म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सूर्याची बॅट शांत झाली आहे. सूर्याला धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. सूर्याच्या फटकेबाजीची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. मात्र ही प्रतिक्षा केव्हा संपणार? याचीच प्रतिक्षा भारतीय चाहत्यांना लागून आहे. टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर पाचवा आणि अंतिम सामना हा 19 डिसेंबरला अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव अहमदाबादमध्ये खास कामगिरी करणार आहे.

सूर्या अहमदाहबादमध्ये धोनीला पछाडणार

टीम इंडियाचा टी 20I कॅप्टन अहमदाबादमधील सामन्यात टॉससाठी मैदानात उतरताच माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला मागे टाकेल. सूर्याच्या टी 2OI कारकीर्दीतील अहमदाबादमधील 99 वा सामना असणार आहे. सूर्यकुमार यादव  यासह टीम इंडियासाठी सर्वाधिक टी 20I सामने खेळणारा चौथा खेळाडू ठरेल. सूर्या यासह धोनीला मागे टाकेल. धोनीने टीम इंडियाचं 98 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

टीम इंडियासाठी सर्वाधिक टी 20I सामने

रोहित शर्मा टीम इंडियाकडून सर्वाधिक टी 20I सामने खेळला आहे. रोहितने भारताचं 150 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. तर या यादीत विराट कोहली 125 सामन्यांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. मात्र रोहित आणि विराट हे दोघेही टी20I क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

हार्दिक पंड्या टीम इंडियासाठी सर्वाधिक सामने खेळणारा एकूण तिसरा तर पहिला सक्रीय खेळाडू आहे. हार्दिकने भारताचं 123 टी 20I सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. तसेच रोहित, विराट आणि हार्दिक हे तिघेच टीम इंडियासाठी 100 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत.

सूर्याची टी 20I कारकीर्द

दरम्यान सूर्याने अवघ्या काही वर्षात कर्णधारपदाला गवसणी घातली. सूर्याने 2021 साली टी 20I पदार्पण केलं होतं. सूर्या पदार्पणाच्या 3 वर्षांतच टी 20I टीमचा कॅप्टन झाला. रोहितने वर्ल्ड कप विजयानंतर टी 20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. सूर्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी 98 टी 20I सामन्यांमध्ये 21 अर्धशतकं आणि 4 शतकांसह एकूण 2 हजार 783 धावा केल्या आहेत.