AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Final Monsoon Update : फायनल होणार रद्द? बार्बाडोसमध्ये तुफान वाऱ्यासह जोरदार पाऊस, Video समोर

IND vs SA Final Monsoon Update : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका फायनल सामना सुरू होण्याआधी पावसाने जोरदार बॅटींगला सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. सामन्यासाठी राखीव दिवस आहे पण तरीही सामना रद्द झाला तर काय असणार निकाल जाणून घ्या.

IND vs SA Final Monsoon Update : फायनल होणार रद्द? बार्बाडोसमध्ये तुफान वाऱ्यासह जोरदार पाऊस, Video समोर
| Updated on: Jun 29, 2024 | 5:51 PM
Share

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील महाअंतिम सामना काही वेळात सुरू होणार आहे. मात्र या सामन्याआधी तिथलं वातावरण पाहिलं तर पावसाची जोरदार बॅटींग सुरू असलेली पाहायला मिळतेय. फायनल सामना संध्याकाळी 8 वाजता सुरू होणार असून त्याआधी 7.30 वाजता टॉस होणार आहे. या सामन्याकडे किकेट विश्वाचं डोळे लागले असून पावसामुळे सामना रद्द होणार नाही अशी प्रार्थना दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया करत असतील. पावसाने सामना जर रद्द झाला तर निकाल काय असणार? कोणत्या टीमला विजयी घोषित केलं जाणार जाणून घ्या.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सामन्याआधी पावसाने बार्बाडोस येथे जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस पडणार असल्याचा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता, त्यानुसार पावसानेही मजबूत बॅटींग सुरू केली आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्याची हा सामना झाला पाहिचे अशीच इच्छा असणार आहे. मात्र आता समो आलेल्या व्हिडीओनुसार तिथे पाऊस पडत आहे. पाऊस सामन्यावेळी थांबला तर सामना सुरू केला जाऊ शकतो. मात्र पावसाचा जोर असाच राहिला तर आज सामना होणं अवघड आहे.

पाहा व्हिडीओ:-

दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियामधील सामन्याआधीच पावसाने हजेरी लावली आहे. आजच्य सामन्यामध्ये अधिकची 250 मिनिटे देण्यात आली आहेत. ज्यामध्ये ओव्हर कमी केल्या जाणार नाहीत. पण जर सामनाच झाला नाहीतर आयसीसीने एक 30 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. पण जर राखीव दिवशीही सामना नाही झाला तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजयी घोषित केलं जाणार आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये फायनल गाठणारे टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने सलग 7 सामने तर आफ्रिकेने 8 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही टीमसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. आफ्रिका संघ  वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पहिल्यांदा जागी मिळवली आहे. तर टीम इंडिया 2007 साली पहिला वर्ल्ड कप जिंकल्यावर एकदाही परत असा कारनामा करता आलेला नाही. त्यामुळे दोन्ही टीमसाठा सामना होण महत्त्वाचं आहे.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.