AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : भारत दक्षिण अफ्रिका डरबन येथील पहिला टी20 सामना रद्द होण्याची शक्यता, झालं असं की…

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. चार सामन्याची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना डरबनमध्ये होणार आहे. तत्पूर्वी क्रीडाप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हा सामना होणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

IND vs SA : भारत दक्षिण अफ्रिका डरबन येथील पहिला टी20 सामना रद्द होण्याची शक्यता, झालं असं की...
Image Credit source: BCCI
| Updated on: Nov 07, 2024 | 3:42 PM
Share

भारतीय संघ टी20 मालिकेसाठी दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना 8 नोव्हेंबरला डरबनमध्ये होणार आहे. टी20 वर्ल्डकप अंतिम सामन्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच सामना खेळणार आहेत. त्यामुळे दक्षिण अफ्रिका त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज असेल. त्यामुळे भारतीय संघासमोर दक्षिण अफ्रिकेचं मोठं आव्हान असणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात युवा संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहे. सूर्यकुमारच्या मदतीला अनुभवी हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल असणार आहेत. भारताने सूर्यकुमारच्या नेतृत्त्वात टी20 वर्ल्डकपनंतर दोन मालिका जिंकल्या आहेत. पहिल्यांदा श्रीलंकेला 3-0 ने लोळवलं होतं. त्यानंतर बांगलादेशला तीन सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेत काय होतं याची उत्सुकता लागून आहे.  या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता असताना पहिल्याच सामन्यावर पावसाचं सावट आहे.

दक्षिण अफ्रिकेत डरबनमध्ये संध्याकाळी 5 वाजता सामना सुरु होईल. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सामना सुरु होईल.पण हवामान खात्यानुसार या दिवशी पावसाची दाट शक्यता आहे. अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, या सामन्यांच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण असेल. पण पाऊस पडेल की नाही हे तेव्हाच स्पष्ट होईल. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता जवळपास 47 टक्के आहे. तसेच दिवसभरात पावसाची शक्यता 50 टक्के आहे. त्यामुळे जर पाऊस पडला तर हा सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार विशक, आवेश खान, यश दयाल.

साउथ अफ्रीकन संघ: एडेन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, गेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रीजा हेंड्रिक्स, मार्को जानसन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेविड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रयान रिकेल्टन, एंडिले सिमलेन, लूथो सिपम (तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी), ट्रिस्टन स्टब्स.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.