AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 लिलावात मुंबई इंडियन्सची कोंडी! 13 खेळाडू निवडताना होणार अशी दमछाक

मागच्या तीन पर्वात मुंबई इंडियन्सची स्थिती एकदम नाजुक राहिली आहे. पाच जेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्सचा कमकुवतपणा मागच्या पर्वात दिसून आला आहे. दिग्गज खेळाडू असूनही हवा तसा निकाल हाती आला नाही. उलट साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. आता रिटेन्शन यादीतच सर्व काही घालवलं असून लिलावात कोंडी होणार आहे.

आयपीएल 2025 लिलावात मुंबई इंडियन्सची कोंडी! 13 खेळाडू निवडताना होणार अशी दमछाक
| Updated on: Nov 06, 2024 | 4:03 PM
Share

आयपीएल मेगा लिलाव 2025 स्पर्धा नोव्हेंबर 24 आणि 25 रोजी सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये होणार आहे. यासाठी एकूण 1574 खेळाडूंनी अर्ज केला आहे. यातून फक्त 204 खेळाडूंचं नशिब फळफळणार आहे. त्यामुळे दहा फ्रेंचायझी आपल्या संघात एखाद्या खेळाडूला घेण्यासाठी किती बोली लावतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सर्वांच्या नजरा या पाच वेळा विजेच्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सकडे आहेत. कारण यात संघात भारतासाठी प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. मागच्या पर्वापासून हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स मैदानात उतरली होती. पण साखळी फेरीतील निराशाजनक कामगिरीनंतर आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबई इंडियन्सने आता हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माला रिटेन केलं आहे. हे पाचही खेळाडू आयपीएलच्या संपूर्ण पर्वात प्लेइंग 11 चा भाग असतील अशीच ही निवड आहे. दुसरीकडे, प्रत्येक फ्रेंचायझीला किमान 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडू संघात घेता येणार आहेत. त्यामुळे मुंबईने रिटेन केलेले पाच खेळाडू पकडले तरी मेगा लिलावात 13 खेळाडूंसाठी बोली लावावी लागणार आहे. त्यामुळे आतापासून अस्वस्थता पसरली आहे.

मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहसाठी सर्वाधिक 18 कोटी रुपये मोजले आहेत. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला 16.35 कोटी रुपये दिले आहेत. तर रोहित शर्माला 16.30 कोटी रुपये दिले आहेत. त्याचबरोबर तिलक वर्माला 8 कोटी रुपये देऊन संघात ठेवलं आहे. त्यामुळे या पाच खेळाडूंवर एकूण 75 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता मेगा लिलावसाठी फक्त 45 कोटी रुपये खिशात आहेत. त्यामुळे या 45 कोटी रुपयात किमान 13 खेळाडूंना संघात घ्यायचं आहे.

मुंबई इंडियन्सची दुखरी बाजू अशी आहे की इशान किशनला रिलीज केलं आहे. त्यामुळे एक विकेटकीपर बॅट्समन घेणं गरजेचं आहे. पण इशान किशन, केएल राहुल असो की ऋषभ पंत यांच्यासाठी मोठी बोली लागणार आहे. दुसरं इशान किशनसाठी राईट टू मॅच कार्ड वापरण्यासाठी मोठी रक्कम भरावी लागू शकते. त्यामुळे इतकी रक्कम मेगा लिलावात 13 खेळाडू घेऊन वाचली तर ठीक आहे. अन्यथा मुंबई इंडियन्सची ही बाजू कमकुवत होऊ शकते.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.