IND vs SA: पुजाराकडून झेल सुटला, भारताला पेनल्टी लागली, दक्षिण आफ्रिकेला फुकटमध्ये मिळाल्या पाच धावा

भारताने पहिल्या डावात 223 धावा केल्या. कसोटीत आव्हान कायम ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला कमी धावसंख्येवरच गुंडाळण आवश्यक आहे.

IND vs SA: पुजाराकडून झेल सुटला, भारताला पेनल्टी लागली,  दक्षिण आफ्रिकेला फुकटमध्ये मिळाल्या पाच धावा

डरबन: केपटाऊनच्या (Capetown test) न्यूलँडस स्टेडिमयवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (India vs South Africa) मालिकेतील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना सुरु आहे. भारताची धावसंख्या फार जास्त नाहीय, अशावेळी धावा वाचवणं गरजेच असताना आज दक्षिण आफ्रिकेला पेनल्टीमध्ये पाच धावा मिळाल्या. भारताने पहिल्या डावात 223 धावा केल्या. कसोटीत आव्हान कायम ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला कमी धावसंख्येवरच गुंडाळण आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पेनल्टी म्हणून अतिरिक्त पाच धावा देणं परवडणार नाही. पण केपटाऊनच्या मैदानावर अशी चूक झाली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पेनल्टी म्हणून पाच धावा बहाल करण्यात आल्या.

मैदानावर नेमकं काय घडलं?

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 50 व षटक शार्दुल ठाकूर टाकत होता. समोर टेंबा बावुमा होता. शार्दुलचा एका सुंदर चेंडू बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये गेला. पहिल्या स्लीपमध्ये पुजारा उभा होता. त्याला ही कॅच पकडता आली नाही. खरंतर त्यावेळी टीम इंडियाला विकेटची आवश्यकता होती. झेल सुटला आणि चेंडू विकेटकिपरच्या हेल्मेटला जाऊन लागला. ऋषभने ते हेल्मेट मैदानात मागे ठेवले होते. या हेल्मेटमुळे भारताला पेनल्टी लागली आणि दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात अतिरिक्त पाच धावा जमा झाल्या.

भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेची हालत खराब आहे. आफ्रिकेकडून पीटरसनने एकाकी झुंजार 72 धावांची खेळी केली. गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा भारतीय गोलंदाजांनी फायदा उचलला. जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

Published On - 7:47 pm, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI