IND vs WI 2nd Day : विंडीज 378 रन्सने पिछाडीवर, टीम इंडिया तिसऱ्याच दिवशी जिंकणार?
India vs West Indies 2nd Test Day 2 Stumps Highlights and Updates : भारतीय संघाने दिल्ली कसोटीवर घट्ट पकड मिळवली आहे. टीम इंडियाला तिसर्या दिवशी विंडीजला झटपट 6 झटके देऊन सलग आणि दुसरा सामना जिंकण्याची संधी आहे.

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतील दुसरा दिवसही आपल्या नावावर केला आहे. भारताने दुसऱ्या कसोटीवर घट्ट पकड मिळवली आहे. यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलच्या शतकी तडाख्याच्या जोरावर भारताने 500 पार मजल मारली. भारताने दुसऱ्या दिवशी पहिला डाव 518 धावांवर घोषित केला. त्यानतंर दिवसाचा खेळ संपेपर्यंत विंडीजने 4 विकेट्स गमावून 140 धावा केल्या आहेत. विंडीजची खेळ संपल्यानतंर शाई होप आणि टेविन इम्लाच ही जोडी नाबाद परतली. शाईने 31 आणि टेविनने 14 धावा केल्यात. विंडीज अजूनही 378 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या सामन्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्याच दिवशी सामना जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विंडीजला 518 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात करता आली नाही. भारताने जॉन कँपबेप याला 10 धावावंर बाद करत विंडीजला पहिला झटका दिला. साई सुदर्शन याने शॉर्ट लेगवर रवींद्र जडेजा याच्या बॉलिंगवर अप्रतिम कॅच घेतला. त्यानंतर टेगनारायण चंद्रपॉल आणि एलिक अथानजे या जोडीने चिवट प्रतिकार केला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना झुंजवलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 66 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान दोघांनी भारतीय फिरकीपटूंचा चांगला सामना केला.
ही जोडी चांगलीच जमली होती. अशात जडेजाने ही सेट जोडी फोडून विंडीजला दुसरा झटका दिला. जडेजाने चंद्रपॉलला 33 धावांवर केएल राहुल याच्या हाती स्लीपमध्ये कॅच आऊट केलं. त्यानंतर कुलदीप यादव याने एलिक अथानजे याला आऊट केलं. विंडीजच्या कॅप्टनला भोपळाही फोडता आला नाहीत. रोस्टन चेज झिरोवर आऊट झाला. जडेजाने चेजला आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. त्यानंतर शाई होप आणि टेविन इम्लाच या दोघांनी भारतीय गोलंदाजांचा सामना केला आणि नाबाद परतले.
टीम इंडियाची बॅटिंग
त्याआधी शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने 2 आऊट 318 पासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. भारताने दुसऱ्या दिवशी 7 धावा जोडल्यांनतर एकूण तिसरी विकेट गमावली. यशस्वी 175 धावांवर रन आऊट झाला. त्यामुळे यशस्वीची तिसरं द्विशतक करण्याची संधी हुकली.
त्यानंतर शुबमन आणि नितीश रेड्डी या जोडीने चौथ्या विकेटसाठी 91 रन्सची पार्टनरशीप केली. नितीश आऊट होताच ही पार्टनरशीप ब्रेक झाली. नितीशने 54 बॉलमध्ये 43 रन्स केल्या.
नितीशनंतर ध्रुव जुरेल मैदानात आला. शुबमन आणि ध्रुव या जोडीने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. शुबमनने या भागीदारीदरम्यान कारकीर्दीतील 10 वं कसोटी शतक झळकावलं. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत धावा जोडल्या. अशात ध्रुव जुरेल 44 धावांवर आऊट झाला. भारताने पाचवी विकेट गमावताच डाव घोषित केला. भारताने 134.2 ओव्हरमध्ये 518 धावा केल्या. शुबमनने 196 बॉलमध्ये नॉट आऊट 129 रन्स केल्या. विंडीजसाठी जोमेल वारिकॅन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
