Ind vs Eng : भारताचा 50 वर्षानंतर ‘ओव्हल’वर विजय, गर्वाने छाती फुगवणारे विराटसेनेचे 6 जबरदस्त रेकॉर्ड

टीम इंडियासाठी ओव्हलवरचा विजय अनेक अर्थांनी खास आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने 50 वर्षांनंतर ओव्हलवर कसोटी सामना जिंकला आहे. 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये भारतीय संघाने प्रथमच इंग्लंडमध्ये ओव्हलवर कसोटी जिंकून मालिकादेखील जिंकली होती.

Ind vs Eng : भारताचा 50 वर्षानंतर 'ओव्हल'वर विजय, गर्वाने छाती फुगवणारे विराटसेनेचे 6 जबरदस्त रेकॉर्ड
भारतीय संघ
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 7:24 AM

Ind vs Eng : विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) इंग्लंडमध्ये इतिहास रचलाय. ओव्हल टेस्टमध्ये टीम इंडियानं इंग्लंड संघाचा (England Cricket Team) 157 धावांनी धुव्वा उडवून तब्बल 50 वर्षानंतर ओव्हलचा गड सर केलाय. विजयासाठी आवश्यक असलेल्या 368 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ सामन्याच्या अखेरच्या दिवशी 209 धावांवर गारद झाला. भारताच्या खेळाडूंनी धमाकेदार प्रदर्शन करत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. या विजयासोबत भारताने मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

टीम इंडियासाठी हा विजय अनेक अर्थांनी खास आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने 50 वर्षांनंतर ओव्हलवर कसोटी सामना जिंकला आहे. 50 वर्षांपूर्वी 1971 मध्ये भारतीय संघाने प्रथमच इंग्लंडमध्ये ओव्हलवर कसोटी जिंकून मालिकादेखील जिंकली होती. आता त्याच विजयाच्या सुवर्णमहोत्सवी दिवशी टीम इंडियाने ओव्हलवर तिरंगा फडकवला आहे, विराटसेनेने ओव्हलवरची वर्षानुवर्षांची पराभवाची मालिका संपवली आहे. याशिवाय टीम इंडियाने देशवासियांची गर्वाने छाती फुगेल असे अनेक विक्रम केले आहेत.

  1. कर्णधार म्हणून कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीचा हा 38 वा विजय आहे. यातही त्याने SENA देशांमध्ये अर्थात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये सहावी कसोटी जिंकली आहे. त्याने या प्रकारात कोणत्याही आशियाई कर्णधाराला मागे टाकले आहे.
  2. इंग्लंडमध्ये भारताचा हा 9 वा कसोटी विजय होता. अशाप्रकारे भारताने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज नंतर चौथ्या देशात 9 कसोटी सामने जिंकले आहेत.
  3. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये एकाच मालिकेत दोन कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम करणारा विराट कोहली पहिला आशियाई कर्णधार बनला आहे. यापूर्वी, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये 2-1 मालिका जिंकली होती.
  4. 1986 नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत दोन सामने जिंकले आहेत. 1986 मध्ये देखील भारताने कसोटी मालिका जिंकली.
  5. परदेशी भूमीवर पहिल्या डावात 200 च्या खाली बाद झाल्यानंतर भारतीय संघाने कसोटी सामना जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2018 मध्ये भारतीय संघाने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटी जिंकली होती.
  6. सामन्याच्या शेवटच्या दिवशी जसप्रीत बुमराहने ऑली पोपला तंबूत पाठवताना कसोटी क्रिकेटमधील आपली 100 वी विकेट घेतली. अशाप्रकारे, बुमराहने 24 कसोटींमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या. कसोटीमध्ये सर्वांत जलद 100 विकेट मिळवणारा वेगवान भारतीय गोलंदाज म्हणून बुमराहच्या नावावर रेकॉर्ड झाला आहे. बुमराहने कपील देव यांचा रेकॉर्ड तोडला आहे. 25 कसोटीत 100 बळी पूर्ण करणाऱ्या कपिल देवचा बुमराहने विक्रम मोडला.

ओव्हलवरच्या विजयाला काही खास गोष्टी कारणीभूत ठरल्या. रोहित शर्माने ठोकलेलं दणदणीत शतक, विराट कोहलीची उत्तम तेवढीच कॅप्टनसी, तसंच वेगवान गोलंदाज उमेश-बुमराह-जडेजाची धारदार गोलंदाजी तर शार्दूलने दोन्ही डावात ठोकलेली अर्धशतके आणि रुटला बाद करत केलेली धडाकेबाज कामगिरीमुळे भारताला ओव्हलवर 50 वर्षानंतर तिरंगा फडकवता आला.

(India Beat England oval test by 157 Runs Indian team records And big Stats )

हे ही वाचा :

ING vs ENG : विराट सेनेनं इतिहास रचला, 50 वर्षानंतर ‘ओव्हल’ सर

VIDEO | IND vs ENG : बुम बुम! यॉर्करकिंगचा विकेट्सचं शतक, कपिल देवला पछाडत विक्रमाला गवसणी

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.