IND vs ENG : टीम इंडियाचा नववर्षातील पहिल्याच विजयासह ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक, कांगारुंना तगडा झटका
Team India World Record : सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने 2025 या वर्षातील पहिलावहिला विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

भारतीय क्रिकेट संघाने 2025 या वर्षाची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने बुधवारी 22 जानेवारीला इंग्लंडवर पहिल्या टी 20I सामन्यात 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने 133 धावांचं आव्हान हे 12.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारतीय खेळाडू या सामन्यात इंग्लंडवर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्हीबाबतीत वरचढ ठरले. त्यामुळेच टीम इंडियाने असा एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडवर 43 बॉलआधी विजय मिळवला. टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्ध सर्वात वेगवान विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 132 धावांवर गुंडाळलं. इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलर याने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्यामुळे भारताला 133 धावांचं आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान अभिषेक शर्मा याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर झटपट पूर्ण केलं. अभिषेक शर्मा याने 8 सिक्स आणि 5 फोरसह 34 बॉलमध्ये 79 धावा केल्या. अभिषेकच्या या वादळी खेळीमुळे भारताला 43 चेंडूआधीच विजय मिळवता आला. भारताने यासह धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा विश्व विक्रम मोडीत काढला.
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला ‘दे धक्का’
भारत इंग्लंडविरुद्ध टी 20I मध्ये 130 पेक्षा अधिक धावांचं आव्हान वेगाने पूर्ण करणारा पहिला संघ ठरला. त्याआधी हा विश्व विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने 7 वर्षांपूर्वी 2018 साली 14.5 ओव्हरमध्ये 130 पेक्षा अधिक धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं.
टीम इंडियाकडून वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Abhishek Sharma’s quickfire 34-ball 79 helped India register their quickest 130+ target run chase.
Sharma smashed 8 sixes in his knock. 😮👌 pic.twitter.com/kSCTMSBEkL
— Cricket.com (@weRcricket) January 22, 2025
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.