AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN : Ravindra Jadejaचा पुन्हा चमत्कार, हवेत डाय मारत कडक कॅच, पाहा Video

Ravindra Jadeja Catch : भारतीय क्रिकेट संघातील चपळ चिता म्हणून ओळख असलेल्या रविंद्र जडेजा याने आज परत एकदा चमत्कार करून दाखवला आहे. जड्डूने पकडलेला कॅच पाहून क्रिकेट विश्वात त्याचं जोरदार कौतुक केलं जात आहे.

IND vs BAN : Ravindra Jadejaचा पुन्हा चमत्कार, हवेत डाय मारत कडक कॅच, पाहा Video
| Updated on: Oct 19, 2023 | 7:36 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील भारत आणि बांगलादेशमध्ये17वा सामना सुरू आहे. (IND vs BAN) बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांन बांगलादेशच्या फलंदाजांवर अंकुश ठेवलं आहे. (Ravindra Jadeja Best Catch against Bangladesh) फक्त गोलंदाजीच नाहीतर फिल्डिंगमध्येही भारतीय खेळाडूंनी कसर सोडली  नाही. भारताचा स्टार फिल्डर रविंदज्र जडेजाचं नावचं बस आहे. आज परत एकदा जड्डूने चमत्कार करून दाखवला. रविंद्र जडेजा याने पाईंटला फिल्डिंग करत असताना डाय मारत कडक कॅच घेतला.

नेमकं काय घडलं?

बांगलादेश संघाच्या विकेट गेल्या असाताना मुशफिकुर रहिम हा मैदानावर एक बाजू लढवत होता. 43 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहकडे रोहित शर्मा याने चेंडू दिला होता. जसप्रीतच्या तिसऱ्या चेंडूवर मुशफिकुरने कट शॉट खेळला, वाऱ्याच्या वेगाने जात असलेल्या चेंडूवर जडेजाने हवेत झेप घेत झडप घातली. रविंद्र जेडजाने उजव्या बाजूली डाय मारत एक कमाल कॅच पकडला.

पाहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

बांगलादेश संघाचा डाव

बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 256-8 धावा केल्या यामध्ये सलामीवील लिटन दास याने सर्वाधिक 66 धावा केल्या. त्यासोबतच शेवटला महमुदुल्ला याने 46 धावा करत संघाची धावसंख्या 250 पार  पोहोचवली होती.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद,  नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.