AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

India vs England 1st T20i Live And Digital Streaming : इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20i मालिकेतील पहिला सामना हा बुधवारी 22 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होईल? सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

IND vs ENG : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी 20 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
england vs india t20iImage Credit source: BCCI
| Updated on: Jan 21, 2025 | 6:37 PM
Share

इंग्लंड क्रिकेट टीमच्या भारत दौऱ्याला बुधवार 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. इंग्लंड या दौऱ्यात टी20I आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 5 टी 20I सामने होणार आहेत. इंग्लंड या टी 20I मालिकेसाठी सज्ज झाली आहे. इंग्लंडने पहिल्या टी 20I सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत सलामीच्या सामन्यासाठी उत्सूक असल्याचे इरादे स्पष्ट केले आहेत. जॉस बटलर हा इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार यादव टीम इंडियाची कॅप्टन्सी करणार आहे. हा पहिला टी 20I सामना कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20I सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20I सामना बुधवारी 22 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20I सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20I सामना कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिल्या टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20I सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20I सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला टी 20I सामना मोबाईलवर डिज्नेप्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

पहिल्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथल, जेमी ओव्हरटन, गस एटकीन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.

इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.