IND vs ENG : टी 20 वर्ल्ड कपनंतर इंग्लंड-इंडिया आमनेसामने, कोण जिंकणार?
India vs England 1st T20i : इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 टी 20i सामन्यांच्या मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना हा कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहे.

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाची युवा ब्रिगेड नववर्षातील पहिलावहिला आंतरराष्ट्रीय आणि टी 20I सामना खेळण्यासाठी तयार आहे. टीम इंडिया नववर्षात इंग्लंडविरुद्ध टी 20I आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20I तर 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. टी 20I मालिकेतील पहिला सामना हा 22 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील हा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन येथे होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सरुवात होणार आहे.
टी 20 वर्ल्ड कपनंतर आमनेसामने
इंडिया-इंग्लंड दोन्ही संघ जवळपास 7 महिन्यांनी आमनेसामने येत आहेत. उभयसंघ अखेरीस टी 20i आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात जून2024 मध्ये आमनेसामने आले होते. टीम इंडियाने इंग्लंडचा टी 20 वर्ल्ड कप 2024 सेमी फायनलमध्ये 68 धावांनी पराभव केला होता. हा सामना 27 जूनला खेळवण्यात आला होता.
सूर्यकुमार यादव कॅप्टन, अक्षर पटेल उपकर्णधार
दरम्यान या मालिकेत नियमित कर्णधार सूर्यकुमार यादव हाच भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर पहिल्यांदाच अक्षर पटेल हा टीम इंडियाच्या उपकर्णधार या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे अक्षरवर बॅटिंग, बॉलिंगसह उपकर्णधार अशी एकूण तिहेरी जबाबदारी असणार आहे. अक्षर या नव्या आव्हानाचा कसा सामना करतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया वरचढ
टीम इंडिया इंग्लंडवर टी 20 क्रिकेटमध्ये वरचढ राहिली आहे. उभयसंघात आतापर्यंत 24 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. टीम इंडियाने 24 पैकी सर्वाधिक 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने 11 वेळा पलटवार करत टीम इंडियाला पराभवाची धुळ चारली आहे.
पहिल्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथल, जेमी ओव्हरटन, गस एटकीन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.