AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | मला खूप वाईट वाटलं…आकाश दीपसोबत पहिल्याच सामन्यात असं काय झालं?

IND vs ENG | रांची टेस्टच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने 302 धावा केल्या. पहिल्या सेशनमध्ये टीम इंडिया ड्राइविंग सीटवर होती. पण पुढच्या दोन सेशनमध्ये इंग्रजांनी पलटवार केला. जो रुटने नाबाद 106 धावा बनवल्या. जॅक क्राउलीने 42, बेन फोक्सने 47 धावा फटकावल्या. भारताकडून आकाश दीपने 3 विकेट काढल्या. पण, तरीही तो स्वत:वर नाराज होता.

IND vs ENG | मला खूप वाईट वाटलं...आकाश दीपसोबत पहिल्याच सामन्यात असं काय झालं?
india vs england 4th ranchi test akash deepImage Credit source: PC-PTI
| Updated on: Feb 24, 2024 | 8:34 AM
Share

IND vs ENG | रांची टेस्टच्या पहिल्या दिवशी जो रुटने नाबाद शतक झळकावलं. त्या बळावर इंग्लंडने 302 धावा केल्या. लंचला इंग्लंडची 5 बाद 112 अशी स्थिती होती. पण त्यानंतरच्या दोन सेशनमध्ये इंग्लंडच्या टीमने भारतावर पलटवार केला. पहिल्या दिवसाच्या खेळात फक्त जो रुटच चमकला नाही, तर पहिला कसोटी सामना खेळणारा वेगवान गोलंदाज आकाश दीपने आपली क्षमता दाखवली. आकाश दीपने पहिल्या सेशनमध्ये कमालीची गोलंदाजी केली. त्याने इंग्लंडचे तीन विकेट काढले. चांगली गोलंदाजी करुन आकाश दीपला रांची कसोटीत एका गोष्टीच खूप वाईट वाटलं. त्या बद्दल दिवसाचा खेळ संपल्यानंतर तो व्यक्त झाला.

“कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळण्याआधी मी थोडा नर्वस होतो. कोच बरोबर बोलल्यानंतर माझ्यात आत्मविश्वास आला” असं आकाश दीपने सांगितलं. “प्रत्येक सामन्याला मी शेवटचा सामना मानून खेळतो. त्यामुळे चांगली गोलंदाजी करायला प्रेरणा मिळते” असं आकाश दीप म्हणाला. सामना सुरु होण्याआधी तो जसप्रीत बुमराहशी बोललो होतो. त्याने आकाश दीपला लेंग्थ खेचण्याचा सल्ला दिला होता. आकाशने सुद्धा मैदानात तेच केलं.

आकाश दीप देवाजवळ काय प्रार्थना करत होता?

आकाश दीपने इंग्लंडचा ओपनर जॅक क्राऊलीला शानदार चेंडूवर बोल्ड केलं होतं. पण तो चेंडू नो बॉल ठरला. या बद्दल आकाश दीपला विचारल तेव्हा तो म्हणाला की, “असं झाल्यानंतर मला खूप वाईट वाटलं. ही चूक टीमच्या पराभवाला कारण ठरु नये, अशी मी देवाजवळ प्रार्थना करत होतो” चांगली बाब म्हणजे आकाश दीपनेच क्राऊलीचा विकेट काढला. ऑली पोप आणि बेन डकेटचा विकेट सुद्धा काढला.

पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.