AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | याला बोलतात नशीब | जसप्रीत बुमराहला आराम दिल्यावर या खेळाडूला लागणार लॉटरी

ind vs eng 4th test | टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 2-1ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा स्ट्राईक बॉलर असलेला बुमराह याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IND vs ENG | याला बोलतात नशीब | जसप्रीत बुमराहला आराम दिल्यावर या खेळाडूला लागणार लॉटरी
प्रातिनिधक फोटोImage Credit source: BCCI
| Updated on: Feb 20, 2024 | 5:15 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे.  येत्या 23 फेब्रुवारीला चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. चौथ्या कसोटी सामन्यामध्ये के.एल. राहुल फिट झाला तर टीममधील रजत पाटीदार याला डच्चू दिला जावू  शकतो. रजत पाटीदा याने दोन्ही कसोटी सामन्यात खराब प्रदर्शन केलं आहे. अशातच टीम इंडियाचा स्ट्राईक बॉलर जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. बुमराह याच्या जागी युवा खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहे तो युवा खेळाडू?

जसप्रीत बुमराह याने सलग तीन कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये बुमराहने 80 ओव्हर टाकल्या आहेत. त्यामुळे त्याला चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विश्रांती दिली जावू शकते. बुमराह याच्या जागी दोन युवा खेळाडूंची नाव चर्चेत आहेत. त्यातील आघाडीवर असलेलं एक नाव म्हणजे मुकेश कुमार आहे. मुकेश याला पहिल्या कसोटी सामन्यामध्ये संधी मिळाली होती मात्र त्याला अवघी एक विकेट घेता आली होती.

दुसरा खेळाडू आहे तो म्हणजे आकाशदीप आहे. आकाशदीप याने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केला नाही. देशांतर्गत किकेटमध्ये केलेल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर टीम त्याने टीम इंडियामध्ये जागा मिळवली. आता आकाशदीप याला प्रतीक्षा आहे ती म्हणजे पदार्पण सामन्याची, चौथ्या कसोटी सामन्यामध्ये ही संधी त्याला मिळू शकते. टीम मॅनेजमेंट नेमका काय विचार करतं हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, टीम मॅनेजमेंटने मोहम्मद सिराज याला एकट्यालाच खेळवत स्पिनरला संघात जाग द्यायचं ठरवलं तर तसंही होऊ शकतं. अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अश्विन आणि जडेजा यांच्यामुळे या खेळाडूंना बेंच गरम करत बसावं लागत आहे. रोहित आणि राहुल कोणत्या मास्टरप्लॅनने मैदानात उतरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.