AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England Live Score, T20 World Cup 2021 : सराव सामन्यात भारत विजयी, 7 गडी राखून विजय

| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 11:12 PM
Share

India vs England Live Score in Marathi: भारताच्या विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वी भारत सराव सामना खेळला. ज्यात भारताने इंग्लंडला 7 विकेट्सनी मात दिली.

India vs England Live Score, T20 World Cup 2021 : सराव सामन्यात भारत विजयी,  7 गडी राखून विजय
केएल राहुल

टी20 विश्वचषकाला सुरुवात झाली असून सध्या ग्रुप स्टेजसचे सामने सुरु आहेत. भारत हा सुपर 12 मध्ये असून सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यात भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. पण तत्पूर्वी सराव म्हणून भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघासोबत भिडणार आहे. यातीलच एक सामना सध्या दुबईच्या मैदानात पार पडला.  ज्यामध्ये भारताने 6 विकेट्सने इंग्लंडला मात दिली. सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. त्यानंतर इंग्लंडने उत्तम फलंदाजी करत 188 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. यामध्ये बेयरस्टोच्या 49, लियामच्या 30 धावांसह मोईन अलीने अखेरच्या काही षटकात 20 चेंडूत केलेल्या नाबाद 43 धावांनी चारचांद लावले. भारताकडून शमीने 3 चाहर आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली. ज्यानंतर भारताने इशान किशनच्या 70 आणि राहुलच्या 51 धावांच्या जोरावर सामना 7 विकेट्सनी खिशात घातला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Oct 2021 11:11 PM (IST)

    IND vs ENG: भारत विजयी

    19 व्या षटकात काही नो बॉल आणि फ्रि हीटमुळे भारताने एक ओव्हर राखून सामना संपवत इंग्लंडवर 7 विकेट्सनी विजय मिळवला.

  • 18 Oct 2021 10:56 PM (IST)

    IND vs ENG: सूर्यकुमार यादव बाद

    भारताला 15 चेंडूत 21 धावांची गरज असताना सूर्यकुमार 8 धावा करुन बाद झाला आहे. आता हार्दीक फलंदाजीला आला आहे.

  • 18 Oct 2021 10:42 PM (IST)

    IND vs ENG: इशान किशनची स्वत:हून माघार

    भारताला सध्या 28 चेंडूत 39 धावांची गरज आहे. दरम्यान इशान किशन 70 धावांवर माघार घेत तंबूत परतला आहे. सराव सामना असल्याने इशानने विश्रांती म्हणून माघार घेतली आहे. सध्या पंत आणि सूर्यकुमार मैदानात आहे.

  • 18 Oct 2021 10:37 PM (IST)

    IND vs ENG: इशान किशन ऑन FIRE!

    इशान किशनने तुफानी फलंदाजी सुरुच ठेवली आहे. त्याने अर्धशतक पूर्ण केलं असून सध्या तो 69 धावांवर खेळत आहे.

  • 18 Oct 2021 10:36 PM (IST)

    IND vs ENG: विराट कोहली आऊट!

    कर्णधार विराट आज सराव सामन्यात खास कामगिरी करु शकला नाही. लियामच्या चेंडूवर आदिल राशिदने 11 धावांवर त्याचा झेल घेतला.

  • 18 Oct 2021 10:10 PM (IST)

    IND vs ENG: केएल राहुल बाद

    अर्धशतक होताच केएल राहुल बाद झाला आहे. मार्क वुडच्या चेंडूवर मोईन अलीने त्याला झेलबाद केलं आहे. आता विराट कोहली फलंदाजीला आला आहे.

  • 18 Oct 2021 10:07 PM (IST)

    IND vs ENG: केएल राहुलचं दमदार अर्धशतक

    भारताचे सलामीवीर राहुल आणि इशान यांनी अप्रतिम सुरुवात केली आहे. राहुलने तर अवघ्या 24 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार खेचत 51 धावा करत अर्धशतक झळकावलं आहे.

  • 18 Oct 2021 09:45 PM (IST)

    IND vs ENG: भारतीय सलामीवीर मैदानात

    189 धावा करण्यासाठी भारतीय फलंदाज मैदानात उतरले आहेत. आज इशान किशनसह केएल राहुल सलामीला उतरला आहे.

  • 18 Oct 2021 09:44 PM (IST)

    IND vs ENG: इंग्लंडची 188 धावांपर्यंत मजल

    अखेरच्या काही षटकात मोईन अलीने धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद 43 धावा झळकावल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडने 188 धावा स्कोरबोर्डवर लावल्या असून आता भारताला विजयासाठी 189 धावा करायच्या आहेत.

  • 18 Oct 2021 09:01 PM (IST)

    IND vs ENG: जॉनीचं अर्धशतक हुकलं

    इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो 49 धावा करुन बाद झाला आहे. बुमराहने त्याला बाद केलं आहे.

  • 18 Oct 2021 08:53 PM (IST)

    रेल्वे पोलिसाने सीपीआर देत वाचवले तरुणाचे प्राण

    रेल्वे पोलिसाने सीपीआर देत वाचवले तरुणाचे प्राण

    अंबरनाथ रेल्वे स्थानकात तरुण हृदयविकाराने पडला बेशुद्ध

    पोलिसांच्या तत्परतेच्या उपचारांनी तरुण पुन्हा आला शुद्धीत

    रेल्वे पोलिसांची तत्परता झाली सीसीटीव्हीत कैद

  • 18 Oct 2021 08:39 PM (IST)

    IND vs ENG: इंग्लंडचा चौथा गडी तंबूत परत

    इंग्लंडचा चौथा गडी लियाम लिव्हिंगस्टोनच्या बदल्यात 30 धावा करुन बाद झाला आहे. शमीनेच त्याला त्रिफळाचीत केलं आहे.

  • 18 Oct 2021 08:33 PM (IST)

    IND vs ENG: जॉनी आणि लियाम क्रिजवर

    सध्या इंग्लंडचे फलंदाज जॉनी बेयरस्टो (31) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (29) हे फलंदाजी करत आहेत. 14 ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोर 118 आहे.

  • 18 Oct 2021 08:32 PM (IST)

    IND vs ENG: इंग्लंडचे 3 गडी बाद

    भारताकडून आतापर्यंत मोहम्मद शमीने उत्तम गोलंदाजी केली असून 2 ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या आहेत. तर राहुल चाहरने 4 ओव्हर संपवत 1 विकेट मिळवली आहे.

  • 18 Oct 2021 08:29 PM (IST)

    IND vs ENG: इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण

    प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने सुरुवात उत्तम केली आहे. भारताने 3 विकेट्स मिळवले असले तरी इंग्लंडने चांगली फलंदाजी करत 100 धावा पूर्ण केल्या आहेत.

Published On - Oct 18,2021 8:28 PM

Follow us
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.