
हार्दिक पंड्या याने इंग्लंडला पहिला झटका दिला आहे. हार्दिकने फिल सॉल्टची शिकार केली आहे. हार्दिकने सॉल्टला 5 रन्सवर उपकर्णधार अक्षर पटेल याच्या हाती कॅच आऊट केलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून जोस बटलर आणि फिलिप सॉल्ट सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 254 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 253 धावा केल्या. तसेच इंग्लंडसमोर विजयासाठी 254 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इतकं मोठं लक्ष्य गाठायचं तर इंग्लंडला पहिल्या षटकापासून आक्रमक खेळी करावी लागेल. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक 89 धावा केल्या. त्याने 42 चेंडूत 7 षटकार आमि 8 चौकार मारत या धावा केल्या. शिवम दुबेने 43, इशान किशन 39, हार्दिक पांड्या 27, तिलक वर्मा 21, अभिषेक शर्मा 9, सूर्यकुमार यादव 11 धावा करून बाद झाले.
हार्दिक पांड्या 2 धावा घेताना धावचीत होत तंबूत परतला. त्याने या षटकात 2 षटकार मारले होते. हार्दिक पांड्या 27 धावा करून तंबूत परतला असून भारताने 250 पार धावा केल्या आहेत.
तिलक वर्माच्या रुपाने टीम इंडियाला सहावा धक्का बसला आहे. पण तिलक वर्माने झंझावाती खेळी करून गेला. त्याने 6 चेंडूत 21 धावा ठोकल्या. त्याने जोफ्रा आर्चरला तीन षटकार मारले.
शिवम दुबेच्या रुपाने टीम इंडियाला पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याच्या चुकीच्या कॉलचा फटका त्याला बसला. त्याचा डाव 43 धावांवर आटोपला. त्याने 1 चौकार आणि 4 षटकार मारले.
भारताने 17व्या षटकात 200 पार धावा केल्या आहे. भारताने 4 विकेट गमवून हे लक्ष्य गाठलं आहे. अजून 3 षटकांचा खेळ बाकी असून यात आणखी भर पडेल. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे जोडी मैदानात आहे.
सूर्यकुमार यादव 6 चेंडूत 11 धावांची खेळी करून बाद झाला आहे. आदिल राशीदच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याच्या चेंडू चुकला आणि यष्टीचीत झाला. जोस बटलरने चूक केली नाही आणि बेल्स उडवल्या.
टीम इंडियाने 15 षटकात 3 गडी गमवून 177 धावा केल्या आहेत. आता टीम इंडिया 200 चा आकडा कधी गाठेल याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून आहे. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे ही जोडी मैदानात आहे.
संजू सॅमसनचं वादळ वानखेडेच्या स्टेडियममध्ये घोंगावलं. त्याने 42 चेंडूत 89 धावा केल्या. पण शतक काही पूर्ण करू शकला नाही. विल जॅक्सच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. पण तिथपर्यंत संजू सॅमसनने आपली भूमिका चोख बजावली होती.
टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज इशान किशन याच्या वादळी खेळीचा शेवट झाला आहे. इशान किशन याने इंग्लंड विरुद्धच्या निर्णायक सामन्यात 18 बॉलमध्ये 39 रन्स केल्या. इशानने या खेळीत 2 सिक्स आणि 4 फोर लगावले.
टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन याने इंग्लंड विरुद्ध आठव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स ठोकत अवघ्या 26 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. संजूचं हे सलग दुसरं अर्धशतक ठरलं.
टीम इंडियाने अतिशय महत्त्वाच्या सामन्यातली पावर प्ले आपल्या नावावर केला आहे. टीम इंडियाने 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 67 रन्स केल्या आहेत. इशान 16 आणि संजू 41 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
अभिषेक शर्मा 9 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या इशान किशन याने स्फोटक सुरुवात केली. तर संजू सॅमसन यानेही आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला आहे. टीम इंडियाने 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 55 रन्स केल्या आहेत. इशान 15 आणि संजू सॅमसन 31 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला आक्रमक सुुरुवात करुन दिली. या दोघांनी 1.5 ओव्हरमध्ये 20 धावा जोडल्या. मात्र दुसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर अभिषेक शर्मा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 9 रन्सवर कॅच आऊट झाला. टीम इंडियाने यासह पहिली विकेट गमावली.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीतील सामन्याला सुरुवात झाली आहे. इंग्लंडने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप साल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
सूर्यकुमार यादव म्हणाला का, आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. उपांत्य फेरी, मोठा सामना, आणि वाराही आहे. जास्त दव पडेल असे वाटत नाही. खेळपट्टी चांगली दिसतेय. सर्व क्युरेटर आणि ग्राउंड्समनना याचं श्रेय जाचं. आम्ही त्याच संघासोबत खेळू.
हॅरी ब्रूक म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. चांगली खेळपट्टी दिसतेय, आशा आहे की आम्ही चेंडूने चांगली सुरुवात करू शकू. या मैदानावर त्यांना आमच्यापेक्षा खूप जास्त अनुभव आहे. टी20 क्रिकेट हा इतका चंचल खेळ आहे की काय होईल हे तुम्हाला कधीच कळत नाही. आशा आहे की आम्ही त्यांना शांत ठेवू शकू. रेहानऐवजी ओव्हरटन संघात आला आहे.
नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. कर्णधार हॅरी ब्रूकने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. दव फॅक्टर नसल्याने भारताला फायदा होईल, असं बोललं जात आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सेमी फायनल मॅचला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हा सामना संध्याकाली 7 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी इंग्लंड टीम : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, रेहान अहमद, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, बेन डकेट, ल्यूक वूड, जोश टंग आणि जेमी ओव्हरटन.
टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर.
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसरा सामना होणार आहे. हा सामना जिंकून कोणता संघ अंतिम फेरीत धडक देतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर न्यूझीलंडने बुधवारी 4 मार्च रोजी न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली आहे.
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात यजमान आणि गतविजेता टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने आहेत. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी न्यूझीलंड विरुद्ध 2 हात करणार आहेत. टी20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत-इंग्लंडची आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघांनी एकमेकांना उपांत्य फेरीत प्रत्येकी 1-1 वेळा पराभूत केलंय. त्यामुळे यंदा कोणता संघ 2-1 अशी आघाडी घेऊन अंतिम फेरीत पोहचणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सामन्यातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.