AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी20 वर्ल्डकपमधील हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी

पाकिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं आहे. तर भारताच्या वाटेला पहिल्याच सामन्यात निराशाजनक पराभव आला आहे. त्यामुळे भारतासाठी साखळी फेरीतील प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताची कसोटी लागणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी20 वर्ल्डकपमधील हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी
| Updated on: Oct 05, 2024 | 7:26 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली आहे. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात भारतासमोर अडचण निर्माण केली आहे. त्यामुळे आता भारताला आता पुढचे तिन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला लढत द्यायची आहे. त्यामुळे भारतासमोर कठीण आव्हान आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार आहे. भारताचा साखळी फेरीतील दुसरा सामना पाकिस्तानशी होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने आधीच संघावर दडपण येणार आहे. त्यात पराभव झाला तर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ दुहेरी कात्रीत अडकला आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर यावेळी पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. याच मैदानात भारताला पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. खूपच वाईट पद्धतीने भारताचा पराभव झाला होता. तर पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत करत विजयी सलामी दिली होती.

टी20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 12, तर पाकिस्तानने 3 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताचं पारडं जड आहे. गेल्या पाच सामन्यांचा निकाल पाहिला तर टीम इंडियाने 4, तर पाकिस्तानने एकच सामना जिंकला आहे. दुसरीकडे, वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पाहिला तर दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत. यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानला 5 वेळा पराभूत करण्यात यश मिळवलं आहे. तर पाकिस्तानने दोन वेळा विजय मिळवला आहे. पण असं असलं तरी भारतासाठी पुढचा प्रत्येक सामना आता जर तरची लढाई आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान शेवटच्या पाच सामन्यांचे निकाल

  • 2024 – भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला.
  • 2023 – भारत 7 गडी राखून विजयी
  • 2022 – पाकिस्तान 13 धावांनी विजयी
  • 2022 – भारत 8 विकेट्सने विजयी
  • 2018 – भारत 7 गडी राखून जिंकला

सामना किती वाजता सुरू होतो?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

कोणत्या वाहिनीवर थेट प्रक्षेपण?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर हा सामना पाहता येईल. तसेच, डिस्ने-हॉट स्टार ॲपवर मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग असेल.

Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार