AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेचा, भारत बॅकफूटवर

राहुलचे अर्धशतक (50) आणि अश्विनच्या (46) धावा या दोघांचा अपवाद वगळता भारताकडून कोणीही चांगली खेळी करु शकले नाही.

IND vs SA: पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेचा, भारत बॅकफूटवर
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 9:48 PM
Share

डरबन: जोहान्सबर्ग मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेत दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व गाजवले. आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी भारताला एक धक्का बसला. नियमित कर्णधार विराट कोहलीने पाठिच्या दुखण्यामुळे कसोटी खेळणार नसल्याचे जाहीर केले. त्याच्याजागी बदली कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या सलामीच्या जोडीने आश्वासक सुरुवात केली. (india vs south africa 2st test match day 1 johannesburg Wanderers Stadium south African bowler effective India on backfoot)

पहिल्या कसोटीतील पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या कसोटीतही दोघे दमदार सलामी देतील असे वाटत होते. पण मयंक अग्रवालला (26) धावांवर जॅनसेनने कार्ल वेरेनकरवी झेलबाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा (3) आणि अजिंक्य रहाणे (0) आल्यापावली माघारी परतले. तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ओलिवरने दोघांची विकेट काढली.

हनुमा विहारीने कर्णधार राहुलसोबत मिळून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण विहारी (20) धावांवर बाद झाला. केएल राहुलचे अर्धशतक (50) आणि अश्विनच्या (46) धावा या दोघांचा अपवाद वगळता भारताकडून कोणीही चांगली खेळी करु शकले नाही. मोठ्या भागीदाऱ्या झाल्या नाहीत, परिणामी भारताचा डाव 202 धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज मार्को जेनसॅनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ओलिवर आणि रबाडाने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 167 धावांनी पिछाडीवर दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर मोहम्मद शामीने मार्करामला पायचीत करुन आफ्रिकेला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर एल्गर आणि पीटरसनने विकेट पडू दिली नाही. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद 35 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 167 धावांनी पिछाडीवर आहे. टीमचा कॅप्टन डीन एल्गर नाबाद (11) आणि किगन पीटरसन नाबाद (14) धावांवर खेळत आहे. उद्या ते डावाला पुढे सुरुवात करतील.

संबंधित बातम्या: 

इंडिगो पेंटवाला घोडा आहे का? घोड्यासोबत धोनीचा फोटो व्हायरल ‘आता फक्त एकच…’, अजिंक्य रहाणेच्या टेस्ट करीअरबद्दल गावस्करांच मोठं विधान IND vs SA : VIDEO: पहिल्या सामन्यात कॅप्टन राहुलने मागितली माफी, मैदानावर असं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.